पनवेलमध्ये तीन अपघातांत चौघे जखमी
पनवेल ः पनवेल परिसरात 24 तासांत झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातांमध्ये चार जण जखमी झाले आहेत. या वेळी घडलेल्या अपघातांत वाहनांचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
पनवेलजवळील मुंबई-गोवा महामार्गावर क्षणभर विश्रांती हॉटेलसमोर पनवेल बाजूकडे जाणार्या रोडवर एका भरधाव टँकरने मोटरसायकलला धडक दिली. या अपघातात मोटरसायकलवरील अजित हवालदार (26, रा. दिव गाव) व त्याचा भाऊ जितेश हवालदार (28) हे दोघे जखमी झाले असून, त्यांच्या मोटरसायकलीचेही नुकसान झाले. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून टँकरचालक मोहम्मद इमामुज्जामा मोहम्मद अमिरुझामा शेख (49, रा. वडाळा, मुंबई) याला ताब्यात घेण्यात आले आहे.
दुसर्या घटनेत भिवंडी, ठाणे येथील अली हसन अख्तर हुसेन शेख हे चिखली, पुणे येथे जाण्यासाठी व्हॅगनार कारने भिवंडी येथून निघाले होते. ते मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कळंबोली सर्कलपासून साडेतीन किलोमीटर अंतरावर आले असता पाठीमागून आलेल्या होंडा सिटी कारने त्यांना धडक दिली. या धडकेत त्यांची मोठी मुलगी अलिषा शेख (19) आणि आदीबा शेख (14) ह्या जखमी झाल्या आहेत. या अपघाताची नोंद कळंबोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. दरम्यान, तिसर्या घटनेत खारघरजवळील कुटुक बंधन चौकाजवळून जाणार्या टेम्पो व गाडीच्या झालेल्या विचित्र अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघाताची नोंद खारघर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya