या कारणामुळे राज्यातील सर्व शिक्षकांच्या सुट्ट्या रद्द
या कारणामुळे राज्यातील सर्व शिक्षकांच्या सुट्ट्या रद्द
मुंबई-: केंद्र सरकारकडून जनगणना 2026 मोहिम सुरू झाली आाहे. मे महिन्यात आता महाराष्ट्रामध्ये जनगणना होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने जनगणनेसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व शिक्षकांच्या सुट्ट्या या रद्द करण्यात आल्या आहेत आता सर्व जिल्हा परिषदांच्या बदल्यांना स्थगिती दिली आहे. गट ‘क’ आणि ‘ड’ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती देण्यात आली आहे. अशी माहिती ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे.
उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये शिक्षकांना विश्रांती मिळणार नाही. उन्हाळ्याच्या सुट्यांत शिक्षकांना जनगणनेचं काम करावे लागणार आहे. त्यामुळे २ मे ते १४ जून या कालावधीत शिक्षकांना प्रत्यक्षात सुटी मिळणार नाही. या कामासाठी जिल्हा परिषदेच्या सुमारे साडेपाच हजार शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय खासगी अनुदानित तसेच महापालिका शाळांतील शिक्षकांनाही जनगणनेची जबाबदारी देण्यात येणार आहे.
जनगणना २०२६ यशस्वी आणि प्रभावीपणे पार पाडण्यासाठी महायुती सरकारने आता महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितलं की, शासनाच्या निर्देशानुसार, जनगणना अधिनियम १९४८ व जनगणना नियम १९९० अंतर्गत येणाऱ्या वैधानिक जबाबदाऱ्या सुरळीत आणि प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी, जिल्हा परिषदेमधील गट ‘क’ व गट ‘ड’ संवर्गातील जनगणनेच्या कामाशी संबंधित सर्व कर्मचाऱ्यांच्या (शिक्षकांसह) सन २०२६ मधील सर्वसाधारण बदली प्रक्रियेस स्थगिती देण्यात आली आहे, अशी महिती गोरेंनी दिली.
या निर्णयामुळे जनगणना करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ स्थिर राहून माहिती संकलन, नोंदणी आणि पडताळणी प्रक्रिया अधिक अचूक, पारदर्शक, वेळेत पूर्ण होण्यास मदत होणार आहे. प्रशासनातील समन्वय अधिक बळकट करत, प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणारी ही जनगणना अधिक प्रभावीपणे राबविण्यास शासन कटिबद्ध आहे. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी अचूक व विश्वासार्ह आकडेवारी अत्यंत महत्त्वाची असून, या निर्णयामुळे जनगणना प्रक्रियेला गती मिळून सुयोग्य नियोजनास अधिक बळकटी मिळणार आहे, असं गोरे यांनी सांगितलं.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर