डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाचा प्रचार आणि प्रसार करु या : स्नेहल कांबळे सामाजिक कार्यकर्त्या
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाचा प्रचार आणि प्रसार करु या : स्नेहल कांबळे सामाजिक कार्यकर्त्या
मुंबई - डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाचा प्रचार व प्रसार करु या असे आवाहन संविधान प्रचारक आणि सामाजिक कार्यकर्त्या स्नेहल कांबळे यांनी विक्रोळी कन्नमवार नगर येथील ज्येष्ठ नागरिक प्रभात मित्र मंडळात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती साजरी करताना केले.प्रास्ताविक मंडळाचे सचिव ज्येष्ठ पत्रकार नासिकेत पानसरे यांनी केले.कार्यक्रमास मंडळाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ वृत्तपत्रलेखक कृष्णा काजरोळकर,माजी अध्यक्ष विनायक पेवेकर, सल्लागार वासुदेव कदम,चित्रोळीकार मुकुंद कुलकणीॅ,सी.के.सर्वगोड आदि मान्यवर उपस्थित होते.स्नेहल कांबळे यांनी आपल्या भाषणात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला.माता रमाई शिवाय डाॅ.बाबासाहेब आंबेडकर अपूर्ण होते.स्वत:ची चार मुले दगावली असताना रमाईने डाॅ.बाबासाहेब आंबेडकर परदेशात असताना स्वत: हाल अपेक्षा सोसून त्यांच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही,ते ज्ञानाचे महासागर,बहुआयामी व्यक्तिमत्व होते.त्यांनी समाजाला प्रवाहात आणले आहे.त्यांनी दिलेल्या समानतेसाठी प्रयत्न केले पाहिजेत.डाॅ.बाबासाहेबांकडे ११ भाषा व ३२ डिग्री होत्या.त्यांनी दिलेले संविधान जगात श्रेष्ठ आहेत असे सांगताना डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची भिमजयंती २०० देशात साजरी होते असे स्नेहल कांबळे यांनी अधोरेखित केले.जगात महिलांना मतदानासाठी झगडावे लागले.परंतू आपल्या देशात डाॅ.बाबासाहेबांनी महिलांना मतदानाचा अधिकार संविधानात दिला आहे.याकडे कांबळे यांनी लक्ष्य वेधले.पुणे स्टेशन जवळील साडे तीन एकरात माता रमाईचे स्मारक आहे.त्याठिकाणी आपण ज्येष्ठ नागरिकांनी भेट द्यावी.असे स्नेहल कांबळे विनम्र पणे म्हणाल्या.प्रारंभी प्रभात मित्र मंडळाच्या गायकांनी प्रभात समयी भिम गीते गाऊन वातावरण प्रफुल्लित केले होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे उपाध्यक्ष निवृत्ती मस्के,उपसचिव श्रध्दानंद निकम, भूमय्या सोमा,विलास देशनेहरे,हरिश्चंद्र गावकर,बबन माने,पोपट साठे आदिंनी बरीच मेहनत घेतली होती.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant