चंद्रपूर जिल्ह्यात देखील भूकंपाचे धक्के…!
चंद्रपूर जिल्ह्यात देखील भूकंपाचे धक्के…!
चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यातील हरदोना खुर्द इथं भूकंपाचे धक्के जाणवले आहेत . 3.4 रेक्टर स्केलचा भूकंप झाल्याची नॅशनल सेंटर ऑफ सिसमोलॉजीने माहिती दिली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात भीतीचं वातावरण पसरलं आहे. सायंकाळी ४ वाजून २२ मिनिटांनी हे भूकंपाचे धक्के जाणवले. 3.4 रेक्टर स्केलवर याची नोंद झाली आहे अशी माहिती नॅशनल सेंटर ऑफ सिसमोलॉजीकडून देण्यात आली आहे.
सायंकाळी 4 वाजून 22 मिनिटांनी हा भूकंप झाला असून गडचांदूर आणि राजुरा या दोन शहराच्यामध्ये आहे हरदोना खुर्द हे गाव आहे. जमिनीपासून 10 किलोमीटर खाली भूकंपाचे केंद्र असल्याची माहिती नॅशनल सेंटर ऑफ सिसमोलॉजीने दिली आहे. नॅशनल सेंटर ऑफ सिसमोलॉजीच्या वेबसाईटवर भूकंपाची माहिती सुद्धा देण्यात आली आहे. पण, हरदोना खुर्द गावामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले असून त्याची तीव्रता ही कमी होती. हा एक सौम्य भूकंपाचा धक्का होता.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade