परेल टी टी उड्डाणपुल दुरुस्तीमुळे कडक निर्बंध; वाहतुकीसाठी पर्यायी मार्गांची अंमलबजावणी
परेल टी टी उड्डाणपुल दुरुस्तीमुळे कडक निर्बंध; वाहतुकीसाठी पर्यायी मार्गांची अंमलबजावणी
मुंबई: भोईवाडा वाहतूक विभाग हद्दीतील संत नामदेव महाराज (परेल टी टी) उड्डाणपुल कमकुवत झाल्यामुळे त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर परिसरातील वाहतुकीवर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
प्रशांत परदेशी, डीसीपी (दक्षिण) वाहतूक, मुंबई यांनी मोटार वाहन अधिनियम १९८८ अंतर्गत अधिकारांचा वापर करून तात्पुरती अधिसूचना जारी केली आहे. दि. ०९/०३/२०२६ पासून दि. ३१/०५/२०२६ पर्यंत परेल टी टी उड्डाणपुल सर्व प्रकारच्या वाहनांसाठी २४ तास पूर्णपणे बंद राहणार आहे. दि. ०९/०३/२०२६ ते दि. १५/०४/२०२६ या कालावधीत संत नामदेव महाराज उड्डाणपुल आणि हिंदमाता उड्डाणपुलाच्या उत्तर वाहिनीवरून वाहतुकीस संपूर्ण बंदी लागू करण्यात आली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील दक्षिण वाहिनीवरून भायखळ्याकडे जाणाऱ्या वाहनांना सकाळी ०७.०० ते संध्याकाळ ०४.०० या वेळेत हिंदमाता उड्डाणपुल आणि परेल टी टी उड्डाणपुलाच्या उत्तर वाहिनीचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सायंकाळी ०४.०० नंतर ही वाहने हिंदमाता आणि परेल टी टी पुलांच्या स्लिप रोडमार्गे मार्गक्रमण करतील.
तसेच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील उत्तर वाहिनीवरून दादरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी सकाळी ०७.०० ते सायंकाळी ०४.०० या वेळेत परेल टी टी आणि हिंदमाता पुलांच्या स्लिप रोडचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. सायंकाळी ०४.०० नंतर संत नामदेव महाराज उड्डाणपुल आणि हिंदमाता उड्डाणपुलाच्या उत्तर वाहिनीचा वापर करण्यास परवानगी दिली आहे.
वाहतूक कोंडीची शक्यता लक्षात घेऊन पर्यायी मार्गांची काटेकोर अंमलबजावणी सुरू आहे. असिस्टंट पोलीस कमिशनर (एसीपी) शेख मॅडम, एडिशनल सीपी नारनवरे मॅडम, डीसीपी प्रशांत परदेशी साहेब तसेच सीनियर पोलीस इन्स्पेक्टर सरदार नाळे यांनी घटनास्थळी उपस्थित राहून वाहतूक बदलांची माहिती दिली आणि नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.
भोईवाडा वाहतूक विभाग आणि मुंबई ट्राफिक दलाकडून नागरिकांना स्पष्ट संदेश देण्यात आला आहे की:
सर्वांनी नियमांचे काटेकोर पालन करावे; सिग्नल सुटला तरी रस्त्यावर हळूहळूच जावे, हट्ट करू नये.
वाहतूक अंमलदारांकडे वाद घालू नये; रस्त्यावर एखादी गाडी अडकल्यास लगेच माहिती द्यावी.
किरकोळ अपघात आणि रस्त्यावर होणाऱ्या अडचणींवर आपापसात वाद करू नये आणि इतर लोकांच्या वाहतुकीत अडथळा आणू नये.
सध्या चालू असलेले रस्त्याचे काम, उड्डाणपुलाचे दुरुस्तीकरण आणि काँक्रिटीकरण हे नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि पावसाळ्यातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. भूतपूर्व खराबीमुळे पावसाळ्यात खड्डे होऊन वाहतुकीला अडथळा निर्माण होतो; त्यामुळे या विकासात्मक कामांचे पालन करणे आपल्या हिताचे आहे.
सीनियर पोलीस इन्स्पेक्टर सरदार नाळे यांनी देखील नागरिकांना आवाहन केले आहे की, ट्राफिक नियम पाळून आणि वाहतुकीच्या अंमलदारांकडे सहकार्य करूनच परिसरात वाहतुकीची सुरळीतता राखता येईल.
मुंबई पोलीस दल, मुंबई वाहतूक विभाग, सीपी देवेंद्र भारती, जॉईंट सीपी कुंभारे साहेब, डीसीपी प्रशांत परदेशी, भोईवाडा वाहतूक प्रमुख सरदार नाळे तसेच बीएमसी अधिकारी यांच्यामध्ये समन्वय वाढवला गेला असून, नागरिकांना कमीत कमी त्रास होईल यासाठी सतत देखरेख ठेवली जात आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, अशी दक्षता संबंधित यंत्रणांनी घेतली आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर