खरातच्या संपर्कातील मंत्र्यांना सहआरोपी करा- संजय राऊत
खरातच्या संपर्कातील मंत्र्यांना सहआरोपी करा- संजय राऊत
मुंबई - नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याला अटक झाल्यानंतर महाराष्ट्र्त खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील काही जण आम्हाला काही माहित नव्हते असा आव आणत आहेत. मात्र या अशोक खरात याच्यावर पहिला गुन्हा साल २००३ मध्ये दाखल झाला होता. साल २००५ मध्येही गुन्हा नोंद झालेला आहे. सकाळ या वृत्तपत्रात खरात याच्या विरोधात लेखमाला प्रसिद्ध झाली आहे. तेव्हा त्या पत्रकाराला धमक्या देण्यात आल्या. तरीही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्याच्याकडे जात असतील, त्याच्या पायावर डोके ठेवत असतील, तंत्र-मंत्र जादूटोणा करत असतील तर या सर्वांना या प्रकरणात सहआरोपी केले पाहिजे अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. नाशिकचे पोलिस आयुक्त या प्रकरणाचा तपास करत आहेत. ते एक निष्पक्ष आणि कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. त्यामुळे या प्रकरणाची पाळेमुळे ते खणून काढतील असाही विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade