कोकणातील या जिल्ह्यातील सर्व गावे येणार विकिपीडियावर
कोकणातील या जिल्ह्यातील सर्व गावे येणार विकिपीडियावर
मुंबई, : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व ७५८ गावांची सविस्तर माहिती लवकरच जागतिक डिजिटल प्लॅटफॉर्म विकिपीडियावर उपलब्ध होणार आहे. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर तसेच शिक्षण विभागाच्या मार्गदर्शनाखाली ‘आपलो सिंधुदुर्ग’ हा उपक्रम राबवला जात आहे.
या उपक्रमाचा उद्देश प्रत्येक गावाचा इतिहास, वैशिष्ट्ये, शैक्षणिक सुविधा, धार्मिक व पर्यटन स्थळे, छायाचित्रे आणि आकडेवारी यांचा समावेश करून गावांची खरी ओळख जगासमोर आणणे हा आहे. प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना यासाठी प्रशिक्षण देण्यात आले असून आतापर्यंत दोन कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील ८० तज्ञ शिक्षकांची निवड करण्यात आली असून त्यांनी आतापर्यंत ६० गावांची माहिती संकलित केली आहे.
सिंधुदुर्ग हा देशातील पहिला एआय-युक्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. प्रशासनाच्या विविध कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुरू झाल्यानंतर आता विकिपीडियावर गावनिहाय माहिती उपलब्ध करून देण्याचा हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला जात आहे. महसूल विभाग आणि जिल्हा परिषद प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प पुढे नेला जात आहे.
या उपक्रमामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याची सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक ओळख जागतिक स्तरावर पोहोचणार असून स्थानिक नागरिकांना तसेच संशोधकांना एकाच ठिकाणी संपूर्ण माहिती सहज उपलब्ध होणार आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant