पनवेलमध्ये लवकरच होणार रतन टाटा कौशल्य विद्यापीठ
पनवेलमध्ये लवकरच होणार रतन टाटा कौशल्य विद्यापीठ
मुंबई, -मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी जाहीर केले की, युवकांमध्ये रोजगारक्षमतेसाठी आवश्यक कौशल्ये विकसित करणाऱ्या रतन टाटा कौशल्य विद्यापीठाची भव्य इमारत लवकरच पनवेल येथे उभी राहणार आहे. या विद्यापीठाची स्थापना जुलै २०२२ मध्ये झाली असून, स्टार्टअप्स, इन्क्युबेशन, प्रशिक्षण, रोजगारक्षमता आणि समुपदेशन यांसारख्या क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रित केले जात आहे. सध्या नवी मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या आवारात तसेच खासगी आस्थापनांमध्ये विद्यापीठाची केंद्रे कार्यरत आहेत.
या विद्यापीठाचा पहिला दीक्षांत सोहळा शनिवार, २१ मार्च २०२६ रोजी दुपारी २ वाजता लोकभवन येथील दरबार हॉलमध्ये होणार आहे. या कार्यक्रमाला उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून अनेक मान्यवरांचा सहभाग अपेक्षित आहे.
दीक्षांत सोहळ्यानिमित्ताने कौशल्याधारित प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. राज्यभरातील आयटीआयशी संलग्न संस्थांचे उपक्रम या ठिकाणी प्रदर्शित केले जातील. उद्योगक्षेत्रातील अग्रगण्य कंपन्यांचे एकूण बारा स्टॉल्स येथे लागणार असून त्यात टोयोटा किर्लोस्कर, अॅटलास, हिंदुस्थान एरोनॉटिक्स, दासयू एव्हिएशन यांचा समावेश आहे. याशिवाय प्रसिद्ध फिल्म निर्माते रॉनी स्क्रूवाला यांचे स्वदेश फाऊंडेशन आणि अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांच्या रूरल डेव्हलपमेंट ट्रस्टचेही स्टॉल्स येथे असतील.
या उपक्रमामुळे युवकांना रोजगाराभिमुख कौशल्यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळेल आणि उद्योगक्षेत्राशी थेट संवाद साधण्याची संधी उपलब्ध होईल. कौशल्याधारित शिक्षणाला चालना देणाऱ्या या विद्यापीठाचा पहिला दीक्षांत सोहळा राज्यातील शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर