महापालिका अधिकाऱ्यांनी महालक्ष्मी येथील लहान पाळीव प्राण्यांच्या रुग्णालयास भेट देऊन केली पाहणी
महापालिका अधिकाऱ्यांनी महालक्ष्मी येथील लहान पाळीव प्राण्यांच्या रुग्णालयास भेट देऊन केली पाहणी
मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिका आणि टाटा ट्रस्ट संचालित लहान प्राण्यांच्या रुग्णालयात लहान प्राणी व पक्ष्यांच्या मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी ताशी ५० किलो क्षमतेची इन्सिनरेटर यंत्रणा उभारण्यात आली असून ती आता कार्यान्वित होण्यास सज्ज आहे. या सुविधेमुळे प्राण्यांच्या मृतदेहांची सुरक्षित व पर्यावरणपूरक विल्हेवाट लावणे शक्य होईल, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांनी दिली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका आणि टाटा ट्रस्ट यांच्याद्वारा संचालित आणि महालक्ष्मी परिसरात स्थित, लहान पाळीव प्राण्यांच्या अत्याधुनिक रुग्णालयास डॉ. अश्विनी जोशी यांनी आज (दिनांक १३ मार्च २०२६) भेट देवून पाहणी केली.
सहायक आयुक्त (जी दक्षिण) श्रीमती स्वप्नजा क्षीरसागर, पशुवैद्यकीय आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. कलिमपाशा पठाण, रुग्णालयाचे संचालक श्री. मेहेरनोश कपाडिया, रुग्णालय प्रशासन आणि सेवा प्रमुख मेजर जनरल श्री. प्रमोद बत्रा आदींची यावेळी उपस्थिती होती.
बृहन्मुंबई महानगरपालिकेचा पशुवैद्यकीय आरोग्य विभागाकडून प्राणी कल्याण सेवा अधिक सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. याच उद्देशाने महानगरपालिकेच्या सहकार्याने टाटा ट्रस्टच्या वतीने महालक्ष्मी येथे लहान प्राण्यांचे रुग्णालय (Small Animal Hospital) कार्यरत आहे. चार मजली इमारतीतील या रुग्णालयात चार सुसज्ज शस्त्रक्रियागृह, तज्ज्ञ पशुवैद्यकीय शल्यचिकित्सकांसह स्वतंत्र शस्त्रक्रिया विभाग, सुमारे २०० प्राण्यांची उपचार क्षमता, जनरल वॉर्ड, आयसीयू आणि हाय डेपेंडन्सी युनिट, एमआरआय, सीटी स्कॅन, एक्स-रे, अल्ट्रासोनोग्राफी, पॅथॉलॉजी लॅब आणि २डी इको यासारख्या अत्याधुनिक निदान सुविधा येथे उपलब्ध आहेत. तसेच, प्राण्यांसाठी रक्तपेढी, दंत उपचार, त्वचारोग, नेत्रचिकित्सा, एंडोस्कोपी, फिजिओथेरपी आणि हायड्रोथेरपी यासारख्या विशेष उपचार सुविधाही येथे आहेत.
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यावेळी म्हणाल्या की, लहान प्राण्यांसाठी एकाच छताखाली बहुउद्देशीय सेवा-सुविधा, अत्याधुनिक निदान आणि उपचार सुविधांनी सुसज्ज असलेले हे देशातील अग्रगण्य रुग्णालय आहे. अशा अत्याधुनिक पशुवैद्यकीय सुविधांमुळे मुंबईतील पशुवैद्यकीय आरोग्य व्यवस्थेला मोठी चालना मिळाली आहे. पाळीव प्राणी व लहान प्राण्यांसाठी दर्जेदार उपचार सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. प्राण्यांच्या मृतदेह व जैववैद्यकीय कचऱ्याच्या शास्त्रोक्त विल्हेवाटीसाठीही रुग्णालयाकडून व्यवस्था करण्यात आली आहे. लहान प्राणी व पक्ष्यांच्या मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी ताशी ५० किलो क्षमतेची इन्सिनरेटर यंत्रणा उभारण्यात आली असून ती आता कार्यान्वित होण्यास सज्ज आहे. या सुविधेमुळे प्राण्यांच्या मृतदेहांची सुरक्षित व पर्यावरणपूरक विल्हेवाट लावणे शक्य होणार आहे. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीनेही त्याचा महत्त्वपूर्ण फायदा होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant