सिटू प्रणीत फेरीवाला युनियन्सचे आझाद मैदानात आंदोलन सुरू
सिटू प्रणीत फेरीवाला युनियन्सचे आझाद मैदानात आंदोलन सुरू
मुंबई -: सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स(सीआयटीयू) महाराष्ट्र राज्य समितीच्या वतीने फेरीवाल्यांच्या न्याय्य हक्कसाठी आणि फेरीवाला कायदा अंमलात आणावा तसेच त्यांच्यावर होत असलेली अन्याय्य त्वरित थांबवावी या मागणीकरिता आज राज्यात सर्व जिल्ह्यात आंदोलन, धरणे निदर्शने करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार आज आझाद मैदान येथे आंदोलन करण्यात आले. मुंबईतील फेरीवाले यांच्यावर कारवाई झाल्यामुळे संतप्त झालेले फेरीवाले उद्या मंत्रालयावर मोर्चा आणणार आहेत.
खासकरून मुंबई आणि एम एम आर ए विभागातील फेरीवाल्या यांच्या वर पालिका आणि सरकार अन्याय करत आहेत.त्यांच्यावर कारवाई करून त्यांचा रोजगार नष्ट करत असून यामुळे फेरीवाले यांच्यावर उपासमारी ची पाळी आली आहे.सरकारने त्यांना संवरक्षण द्यावे म्हणून हा मोर्चा असल्याचे जनवादि हॉकर्स सभा आणि सिटूचे राज्य उपाध्यक्ष डॉ एस के रेग राज्य सचिव के नारायनण यांनी दिली.
कायद्याच्या कलम 3.3 अंतर्गत सरव्हेत समाविष्ट संरक्षित असल्याने त्यांच्यावरील कारवाई त्वरित थांबवावी. अधिकृत –अनधिकृत फेरीवाला कोण याचा निर्णय न झाल्यामुळे कारवाई करण्याचा निर्णय मागे घेण्यात यावा., सर्व नगर फेरीवाला समिती त्वरित अधिसूचित करण्यात याव्यात.
पदपथविक्रेता (उपजीविका संरक्षण व विनियमन) कायदा -2014 कायदा अन्वये फेरीवाल्यांचे आधी नियमन करणे गरजेचे आहे. त्याची प्रक्रिया पूर्ण करण्यास राज्य शासनास योजना बनविण्यासाठी पाठपुरावा करणे. या प्रश्नांना घेऊन आमची युनियन राज्याभारात सातत्याने आंदोलन करत आहे.ही लढाई थांबणार नाही असे आवाहन सिटू चे राष्ट्रीय उपाध्यक्ष व राज्यध्यक डॉ डी एल कराड आणि राज्य कौन्सिल सदस्य शैलेंद्र कांबळे यांनी सांगितले.
पीएम स्वनिधी योजने अंतर्गत एलओआर प्रमाणपत्र व कर्ज प्राप्त फेरीवाले यांच्यावर कारवाई झाल्यास त्यांना मिळालेले कर्ज ते कसे फेडणार? या मुळे त्यांच्यावर देखील कारवाई करू नये ही विनंती.
कायद्यात दर पाच वर्षांनी सर्व्हे करण्याचे नमूद आहे, याद्वारे आम्ही अशी मागणी करीत आहोत की त्वरित सर्व ठिकाणी फेरीवाल्यांचा सर्व्हे करावा. ट्विटर अथवा इतर माध्यमांद्वारे होत असलेल्या तक्रारींची शहानिशा करून त्या तक्रारीचे निरसन करावे. अशा अनेक मागण्या फेरीवाल्यांकडून केल्या जात आहे
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade