मुंबईची डॉ. कनिष्का पाटील आता होणार अभिनेत्री कनिष्का पाटिल.
मुंबईची डॉ. कनिष्का पाटील आता होणार अभिनेत्री कनिष्का पाटिल.
मुंबईस्थित डॉ. कनिष्का पाटील "कोरडी हळद" या मराठी चित्रपटात मुख्य नायिकेची भूमिका साकारणार आहेत.
"कोरडी हळद" हा २०२७ मध्ये प्रदर्शित होणारा एक नवीन आणि एकदम वेगळ्या धाटणीचा मराठी चित्रपट आहे, जो ग्रामीण भागातील तीव्र पाणीटंचाईचे जिवंत वास्तव दाखवत आहे. चिनी चेतन या चित्रपटाचे नृत्यदिग्दर्शक, लेखक आणि दिग्दर्शक म्हणून काम करत आहेत. "कोरडी हळद" हा चित्रपट एक वास्तववादी थ्रिलर आहे जो जगण्यासाठी पाणी किती महत्त्वाचे आहे हे दाखवतो.
देवराज मुव्हीजच्या बॅनरखाली सुखदेव मिश्रीलाल जैसवार निर्मित हा चित्रपट पाण्याच्या तीव्र दुष्काळावर आधारित आहे.
"कोरडी हळद" फिल्मसाठी लेखक-दिग्दर्शक चिनी चेतनला एका नवीन चेहऱ्याची आवश्यकता होती, म्हणून त्यांनी अनेक नवीन कलाकारांचे ऑडिशन घेतले, परंतु त्यांना त्यांच्या चित्रपटाला साजेशी अभिनेत्री सापडत न्हवती. पण जेव्हा त्यांनी डॉक्टर कनिष्का पाटीलचे ऑडिशन केली आणि तिला पाहिले. तेव्हा चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक चिनी चेतन यांना कनिष्कचे ऑडिशन आणि तिचा साधा सिंपल लूक हे दोन्हीही फिल्मच्या हिशोबाने मुख्य नायिकेच्या भूमिकेसाठी अगदी योग्य निवड आहे असे वाटले. त्यामुळे चिनी चेतन म्हणतात की कनिष्क पाटीलचा साधेपणा या चित्रपटात त्याच्या भावनिक खोली आणि जन आकर्षणासाठी ओळखला जाईल.
नृत्यदिग्दर्शक-लेखक-दिग्दर्शक चिनी चेतन हे "कोरडी हळद" मागे त्यांचे दृष्टिकोन सांगताना म्हणाले की हा केवळ एक चित्रपट नाही तर एक चळवळ आहे, पाणीटंचाईशी झुंजणाऱ्या गरीब लाचार लोकांसाठी एक आवाज आहे.
हा चित्रपट महाराष्ट्रातील मराठवाड्यातील वास्तवावर आधारित आहे. या चित्रपटात डॉक्टर कनिष्का पाटील ग्रामीण भाषा शिकण्यात, सीन बाय सीन अभिनयाचे धडे गिरवण्यात आणि फिल्मच्या भावनिक सचोटीसाठी प्रचंड परिश्रम घेत आहे. पत्रकार म्हणून, आमचे वैयक्तिक मत असे आहे की हा चित्रपट केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात मराठी चित्रपट उद्योगासाठी एक नवीन नाव नवीन ऊर्जा बनेल.
हा चित्रपट भारताच्या दुष्काळ, तीव्र पाण्याची कमतरता आणि ग्रामीण भागातील गरीब लोकांच्या जिवंत राहण्यासाठी रोज कसे मरतात. हा चित्रपट अंगावर काटा आणणारे भावनांचे स्पष्टपणे चित्रण करतो.
या चित्रपटाची कथा लेखक-दिग्दर्शक चिनी चेतन यांनी लिहिली आहे. चिनी चेतन हा प्रामुख्याने नृत्य दिग्दर्शक आहे. त्याने दक्षिण भारतीय चित्रपट, कन्नड चित्रपट, तेलगू चित्रपट, गुजराती चित्रपट, बंगाली चित्रपट, मराठी आणि हिंदी अशा विविध भाषांमधील असंख्य चित्रपटांमध्ये नृत्य दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. चिनी चेतनला कथाकथनाचाही व्यापक अनुभव आहे.
देवराज मुव्हीजच्या बॅनरखाली हा चित्रपट तयार केला जात आहे आणि त्याचे निर्माते सुखदेव मिश्रीलाल जैसवार आहेत.
कोरडी हळदचे उद्दिष्ट केवळ चित्रपट बनवणे नाही तर आपली कला आणि संवेदनशीलता राष्ट्रीय रंगमंचावर आणणे आहे.
डॉक्टर कनिष्क पाटील आणि चित्रपटाच्या संपूर्ण निर्मिती टीमला विश्वास आहे की "कोरडी हळद" हा केवळ एक चित्रपट नाही, तर तो मराठवाड्याच्या संघर्षाची, पाण्याच्या प्रश्नांची आणि मानवी इच्छाशक्तीची राष्ट्रीय कथा नक्कीच बनेल - आणि भविष्यात "कोरडी हळद" हा चित्रपट राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकणारा मराठीतला यशस्वी चित्रपट ठरेल.
कोरडी हळदची मुख्य टीम:
देवराज मूव्हीज प्रस्तुत
निर्माता - सुखदेव मिश्रीलाल जैसवार
सह-निर्माता - दत्तात्रय पाटील
नवीन पदार्पण अभिनेत्री - डॉ कनिष्का पाटील
लेखक-दिग्दर्शक - चिनी चेतन
संगीत - संदीप डांगे
कार्यकारी निर्माता - नजीर सय्यद
लाईन प्रोड्युसर - विष्णू चौधरी
लोकल प्रोडक्शन प्रमुख - वाल्मिक गाडे पाटील, सुरेश जगताप
शिर्डीतील कलाकार - विष्णू चौधरी, सचिन वाणी, रामनाथ कातोरे, प्रदीप फटांगरे, सचिन घेवराईकर, महेश लोखंडे, आणि इतर अनेक.
सहाय्यक दिग्दर्शन - मॅक मकवाना, सचिन कांबळे, शलाका पाटील आणि आबा.
या चित्रपटाला शिर्डी नगराध्यक्ष अभय भैय्या शेळके यांचे पूर्ण सहकार्य व प्रेम आहे. त्यामुळे साई बाबांचे आशीर्वाद आणि अभय भैय्या यांच्या मदतीने या चित्रपटाला कोणतीही अडचण येणार नाही.
आमच्याकडून कोरडी हळदच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा.
अभय भैया शेळके (शहराध्यक्ष, शिर्डी) यांचे विशेष आभार.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade