नैसर्गिक वायू पुरवठ्यासाठी ‘अत्यावश्यक वस्तू कायदा’ लागू
नैसर्गिक वायू पुरवठ्यासाठी ‘अत्यावश्यक वस्तू कायदा’ लागू
नवी दिल्ली - अमेरिका-इस्रायल-इराण संघर्षामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज (दि.१०) Essential Commodities Act, 1955 (आवश्यक वस्तू कायदा) लागू केला आहे. नैसर्गिक वायू आणि एलपीजीचा पुरवठा खंडित होऊ नये तसेच घरगुती गॅस उपलब्धता कायम राहावी, यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार, नैसर्गिक वायूचा पुरवठा प्राधान्यक्रमानुसार वाटप करण्यात येणार आहे. काही महत्त्वाच्या क्षेत्रांना मागील सहा महिन्यांच्या सरासरी वापराच्या १०० टक्के पुरवठा निश्चित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्याचबरोबर घरगुती स्वयंपाक गॅसचा पुरवठा अखंडित राहावा यासाठी तेल शुद्धीकरण प्रकल्प आणि पेट्रोकेमिकल उद्योगांना एलपीजी उत्पादन वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या क्षेत्रांना प्राधान्य
घरगुती पाइपद्वारे पुरवठा होणारा नैसर्गिक वायू (PNG-Piped Natural Gas)
वाहनांसाठी संकुचित नैसर्गिक वायू (CNG-Compressed Natural Gas)
एलपीजी उत्पादन आणि संबंधित प्रक्रिया (LPG-Liquefied Petroleum Gas)
पाइपलाइन कॉम्प्रेसर इंधन आणि आवश्यक गरजा
या क्षेत्रांना मागील सहा महिन्यांच्या सरासरी वापराच्या १०० टक्के पुरवठा राखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant