महा ई सेवा व आधार सेवा केंद्र धारकांच्या विविध मागण्या बाबत आझाद मैदानात आंदोलन सुरू
महा ई सेवा व आधार सेवा केंद्र धारकांच्या विविध मागण्या बाबत आझाद मैदानात आंदोलन सुरू
मुंबई - महा-ई-सेवा व आदर्श व केंद्र धारकांच्या विविध मागण्याबाबत आज अजून मैदान येथे धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात केंद्र धारक उपस्थित होते.
राज्यातील महा ई सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र धारक हे शासनाच्या विविध डिजीटल सेवा व्दारे नागरिकांना सेवा पुरवत आहेत. या सेवामुळे शासनाच्या कार्यक्षमतेत वाढ होवुन नागरिकांचा वेळ, श्रम, पैसा वाचत असुन शासनाचीही मोठ्या प्रमाणावर अर्थिक बचत होत आहे. तसेच या माध्यमातुन बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. मात्र प्रत्यक्ष कार्यरत असलेल्या महा ई सेवा व आधार सेवा केंद्र चालकांना दिर्घ काळापासुन विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. थकित कमिशन न मिळणे, अचानक नियम बदलणे, केंद्र बंद करण्याची कारवाई, सेवा केंद्र चालकाना कोणतेही मासिक मानधन किंवा सामाजिक सुरक्षा उपलब्ध नाही, योग्य मानधन व संरक्षणाचा अभाव यामुळे केंद्र चालकांवर अन्याय होत आहे. या शिवाय नियमामध्ये वारंवार होणारे बदल, नवीन केंद्राची अनियंत्रीत वाढ, तसेच कोणतीही पुर्व सुचना न देता केंद्रे बंद करण्याची कारवाई यामुळे सेवा केंद्र चालकांवर आर्थिक व मानसिक ताण निर्माण होत आहे. तेव्हा आमच्या मागण्या झाल्यास नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवा या अधिक कार्यक्षमतेने व सुरळीतपणे उपलब्ध करुन देता येतील असा आम्हास विश्वास आहे.
शासनाने नविन महा ई सेवा केंद्रे देणे थांबवावे आणि आधिच्या नियमांची
पुन्हा तपासणी करावी. तसेच आधार सेवांचे थकित कमिशन त्वरित द्यावे. ऑपरेटरना ब्लॅकलिस्ट करु नये. त्यांना योग्य प्रशिक्षण द्यावे जुनी किट बदलुन नविन किट द्यावी. तसेच महाऑनलाईन, महाआयटी व सी एम एस कडील सर्व थकीत रक्कम तात्काळ अदा करावी. त्याचप्रमाणे आधार प्रकल्पासाठी घेतलेली रु. ५०००० डिपॉझिट रक्कम केंद्र चालकाना परत द्यावी. तसेच शासनाने नेमलेल्या नवीन कंपनीने VLE यांना योग्य त्या सुविधा व आधार किटस द्याव्यात. लोकसंख्येच्या प्रमाणातच केंद्राची संख्या ठेवावी. अनावश्यक नवीन केंद्रे देवू नयेत.
तसेच आधारमध्ये नाव बदलासाठी QR कोड नसलेल्या विवाह प्रमाणपत्राबाबत कोणती तरतुद आहे. शासनाकडुन QR आधारित प्रमाणपत्र प्रणाली लागु होईपर्यंत नागरिकांनी प्रतिक्षा करावी का या बाबत स्पष्ट मार्गदर्शक सुचना असाव्यात. तर आधार नोंदीमध्ये आडनाव शेवटी असुन शैक्षणिक प्रमाणपत्रामध्ये आडनावसुखातीला असल्याने DOB साठी अशा प्रकराणाची हाताळणी कशा प्रकारे करावी अशा विसंगती मुळे ऑपरेटरना DOE2 अतंर्गत चुकीने फ्लॅग होण्याचा धोका असतो अशा विविध मागण्या या ठिकाणी शासनाकडे मांडण्यात आल्या.
या संदर्भात वारंवार निवेदने देवुनही व न्यायालयीन याचिका दाखल करुनही आमच्या मागण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे नाईलाजाने आम्ही मागण्या मान्य करुन घेण्यासाठी आज आझाद मैदान मुंबई येथे राज्यव्यापी काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या कालावधीत सेवा विस्कळीत झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही शासनाची राहील अशी माहिती राज्य सचिव विनोद तायडे यांनी दिली.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर