महायुती सरकारने शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पाळले
महायुती सरकारने शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पाळले
मुंबई -अर्थसंकल्प आणि शेती यातील शून्य ज्ञान असलेले संजय राऊत शुक्रवारी सादर झालेल्या अर्थसंकल्पावर टीका करत आहेत हा मोठा विनोद आहे. नजिकच्या काळात कुठल्याही निवडणुका नसतानाही भाजपा महायुती सरकारने कर्जमुक्तीचे वचन पाळले आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार हे शेतकऱ्यांची फसवणूक करणारे सरकार होते अशी खरमरीत टीका भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शुक्रवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मविआच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात शेतक-यांना फुटकी कवडी देखील देण्यात आली नव्हती याची आठवण करून देत बन यांनी कर्जमाफीची अंमलबजावणी होणार असल्याची ग्वाही दिली. बन म्हणाले की, अर्थसंकल्पात शेतक-यांना दिलासा देत 30 सप्टेंबर 2025 रोजी पीककर्ज थकित असलेल्या पात्र शेतकर्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी घोषित करण्यात आली आहे. भाजपा महायुती सरकार हे मविआ सरकार सारखे कागदी घोडे नाचवणारे सरकार नसून शब्दाला जागणारे सरकार आहे.
अर्थसंकल्पातील घोषणा अंमलात नक्की आणली जाणार अशी ग्वाही बन यांनी दिली. मविआ सरकराने केलेली कर्जमाफी फसवी होती. कोकणात वादळामुळे पिडीत शेतकऱ्यांना दिलेले मदतीचे आश्वासनही हवेत विरले होते असा टोला त्यांनी लगावाला. याउलट एकनाथ शिंदे महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी कर्जमाफी केली. भाजपा महायुती सरकारने शेतक-यांना मोफत वीज, सिंचन सुविधा, शेततळे, कृषी पंप, सौर पंप, शेतकऱ्यांना अवजारे अनुदानावर देणे यांसारख्या सुविधा दिल्या. शेतक-यांच्या उत्पादनांना हमीभाव मिळावा यासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रयत्नशील आहे. मात्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांसाठी कोणती नवी योजना सुरू केली होती याची माहिती राऊतांनी द्यावी असे आव्हान ही त्यांनी दिले.
विरोधकांना चपराक लगावणारा अर्थसंकल्प
राज्यातील सर्वसामान्य जनतेचे हित साधत राज्याला विकासाच्या मार्गावर गतीने घेऊन जाणारा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला आहे. सर्वदूर विकास आणि राज्याची प्रगती पाहता राऊत आणि आदित्य ठाकरे यांची पोटदुखी आणिकच बळावली असल्याचा टोमणा बन यांनी लगावला. पायाभूत सुविधा विकास हा गतीने करण्यासाठी या अर्थसंकल्पात अनेक नव्या प्रकल्पांची घोषणा आणि जुने प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यासाठी निधीची तरतूद केली आहे. मात्र मुंबई महापालिकेमध्ये 25 वर्षे ठेकेदारांचे भले करणा-या उबाठा गटाला सगळीकडे ठेकेदारच दिसत असल्याने हा ठेकेदारांचा अर्थसंकल्प असल्याचे भासते अशी खिल्ली त्यांनी उडवली. हा अर्थसंकल्प ठेकेदारांचा नाही, तर विरोधकांना चपराक लगावणारा अर्थसंकल्प आहे अशी टीका त्यांनी केली.
महायुतीचे सरकार असेपर्यंत लाडकी बहीण योजना सुरूच रहाणार
भाजपा महायुतीचे सरकार कायम लाडक्या बहिणींच्या मागे खबंरपणे उभे आहे. लखपती दीदी, लाडकी बहीण योजनेने महिलांचा स्वाभिमान जपला. या उलट उबाठा गट आणि काँग्रेसच्या वतीने लाडकी बहीण योजना बंद करण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र लाडकी बहीण योजना ना उद्धव ठाकरे, ना संजय राऊत, ना काँग्रेसचे सुनील केदार बंद करू शकतात असे बन यांनी ठणकावून सांगितले.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर