शिवडी, मुंबईतील टी. जे. रोडवरील अनधिकृत प्रकारांवर कारवाई;
शिवडी, मुंबईतील टी. जे. रोडवरील अनधिकृत प्रकारांवर कारवाई; नागरिकांकडून पोलीस व बीएमसी अधिकाऱ्यांचा सत्कार
शिवडी विभागातील टी. जे. रोड परिसरात वाढलेल्या अनधिकृत फेरीवाले, अनधिकृत पार्किंग तसेच अनधिकृत मच्छी बाजारामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी व गैरसोयींचा सामना करावा लागत होता. या समस्येविरोधात टी. जे. रोडवरील हाय राईझ सोसायटीतील रहिवाशांनी एकत्र येऊन स्थानिक पोलीस, ट्राफिक पोलीस व बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) यांच्याकडे लेखी तक्रार केली होती.
नागरिकांच्या तक्रारीची त्वरित दखल घेत पोलीस, ट्राफिक विभाग व बीएमसी अधिकाऱ्यांनी संयुक्त कारवाई करत अनधिकृत फेरीवाले, बेकायदेशीर पार्किंग व अनधिकृत मच्छी बाजार हटवून टी. जे. रोड नागरिकांसाठी रहदारीसाठी मोकळा केला. या कारवाईमुळे परिसरातील वाहतूक सुरळीत झाली असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
या उल्लेखनीय कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी टी. जे. रोड येथील हाय राईझ सोसायटीतील रहिवाशांनी एकत्र येत पोलीस, ट्राफिक पोलीस व बीएमसी अधिकाऱ्यांचा भव्य सत्कार आयोजित केला. यावेळी असिस्टंट पोलीस कमिशनर श्री. सचिन कदम, सीनियर पोलीस इन्स्पेक्टर श्री. विनोद तावडे तसेच सीनियर पोलीस इन्स्पेक्टर (ट्राफिक) श्री. सरदार नाळे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह उपस्थित राहून नागरिकांना सुशिक्षित नागरिक म्हणून आपली जबाबदारी पार पाडण्याचे महत्त्व पटवून दिले व योग्य ते मार्गदर्शन केले.
याच प्रसंगी टी. जे. रोड येथील हाय राईझ सोसायटीच्या सदस्यांनी एकत्र येऊन “स्वच्छ शिवडी, सुंदर शिवडी, शिस्तबद्ध शिवडी, कटिबद्ध शिवडी” या अभियानाची सुरुवात केली. या अभियानाचे अनावरण असिस्टंट पोलीस कमिशनर श्री. सचिन कदम यांच्या हस्ते करण्यात आले.
या उपक्रमामुळे नागरिक व प्रशासन यांच्यातील समन्वयाचे उत्तम उदाहरण पाहायला मिळाले असून भविष्यातही परिसर स्वच्छ, सुंदर व शिस्तबद्ध ठेवण्याचा निर्धार रहिवाशांनी व्यक्त केला.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant