मायेची ऊब… मानवतेचा स्पर्श!
"राजे फाऊंडेशन (महाराष्ट्र राज्य)" यांच्या वतीने कस्तुरबा रुग्णालयातील गरजू रुग्णांसाठी थंडीपासून बचाव व्हावा या हेतूने “मायेची ऊब” या उपक्रमांतर्गत ब्लॅंकेट वाटप करण्यात आले. या थंड वातावरणात उबदार चादरींसोबतच प्रेमाची ऊब देण्याचा हा छोटासा प्रयत्न मनाला स्पर्श करून गेला.
याचबरोबर रुग्णांना बिस्किटे, ताजी फळे आणि ज्यूसचेही वाटप करण्यात आले. आजारपणामुळे त्रस्त असलेल्या रुग्णांच्या चेहऱ्यावर या उपक्रमामुळे उमटलेले हलकेसे हास्य हेच या सेवाकार्याचे खरे समाधान ठरले.
समाजात मानवतेची भावना जिवंत ठेवत, “सेवा हीच खरी पूजा” या भावनेतून राजे फाऊंडेशन सातत्याने सामाजिक कार्य करत आहे. गरजूंच्या आयुष्यात थोडीशी आनंदाची किरणे पसरवण्याचा हा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद ठरला आहे.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी फाऊंडेशनच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे विशेष योगदान लाभले.
उपस्थित मान्यवर व पदाधिकारी: , राजे फाऊंडेशन चे अध्यक्ष- श्री सिद्धांत पिसाळ , सचिव - श्री रोहित पिसाळ , उपखजिनदार- ऋषिकेश आचारी , सोशल मीडिया प्रमुख- प्रदीप कस्तुरे आणि मयुरेश पाटील तसेच प्रशांत गुप्ता, सूर्यकांत रेडेकर, योगेश कांबळे, राहुल माने इत्यादी सदस्य उपस्थित होते व कस्तुरबा रुग्णालय चे सर्व प्रशासन कर्मचारी डीन आणि तेथील परिचारिका हे देखील या उपक्रमांमध्ये सहभागी होते.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant