*छात्र भारतीचे 42 वे राज्य अधिवेशन उद्या मुंबईत होणार संपन्न..
प्रेस नोट,
विज्ञान युगातील विद्यार्थ्यांची समतावादी संघटना म्हणून ओळख असणाऱ्या छात्र भारती विद्यार्थी संघटनेचे 42 वे राज्य अधिवेशन उद्या शनिवार दि. 24 जानेवारी 2026 रोजी समाज मंदीर, शहीद भगतसिंग मैदान, काळाचौकी येथे संपन्न होणार आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन पद्मश्री डाॕ. झहीर काझी, समाजवादी नेते कपिल पाटील, राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित शिंदे, महाराष्ट्र अध्यक्ष राजा कांदळकर यांच्या हस्ते संपन्न होईल. उद्घाटन सत्रात प्रा. नीरज हातेकर यांचे महाराष्ट्राचा (बे) रोजगारनामा व विद्यार्थ्यांची भूमिका या विषयावर विशेष व्याख्यान असेल.
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता पृथ्वीक प्रताप हे कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असतील. आपल्या विद्यार्थी दशेतील अनुभव व विद्यार्थी मित्रांना पुढील आयुष्यासाठीची वैचारिक शिदोरी आपल्या हलक्या फुलक्या विनोदी शैलीत ते देतील.
जल- जंगल-जमीन या विषयावर रॕप सादर करणाऱ्या आदिवासी रॕपर माही जी व ब्रिगेडियर यांचे रॕप सादरीकरण असेल.
विद्यार्थी व अर्थकारण या विषयावर प्रा. संजीव चांदोरकर हे विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.
“आजच्या काळात लोकशाही मूल्यांची जपणूक करण्यासाठी विद्यार्थ्यांनी संघटित होऊन विधायक मार्गाने लढणे अत्यंत गरजेचे आहे. हे अधिवेशन विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे आणि त्यांच्या वैचारिक जडणघडणीला दिशा देणारे ठरेल,” असा विश्वास छात्र भारती संघटनेचे राज्य अध्यक्ष रोहित ढाले यांनी व्यक्त केला.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant