जनहित लोकशाही पार्टीकडून महायुतीच्या दणदणीत विजयाबद्दल जाहिर आभार
मुंबई : 25/2026 च्या महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख मा. एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला जनहित लोकशाही पार्टीने जाहिर पाठींबा दिला होता. या पाठींब्यामुळे मुंबईत महायुतीला प्रचंड मताधिक्याने घवघवीत यश मिळाले असून, या विजयाचा आम्हाला मनापासून आनंद व अभिमान असल्याची भावना जनहित लोकशाही पार्टीने व्यक्त केली आहे.
या निवडणुकीतील महायुतीच्या विजयामध्ये जनहित लोकशाही पार्टीचा मोलाचा सहभाग असून, पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळेच हा ऐतिहासिक विजय शक्य झाला, असे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातही महायुतीने विजयाची पताका फडकावली असून, हे यश जनहित लोकशाही पार्टीच्या स्पष्ट भूमिकेचे व जनतेच्या विश्वासाचे द्योतक आहे.
जनहित लोकशाही पार्टीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक हे या विजयासाठी निश्चितच अभिनंदनास पात्र असून, पक्षाने घेतलेला निर्णय योग्य ठरल्याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे, असे मत व्यक्त करण्यात आले.
यावेळी जनहित लोकशाही पार्टीचे पक्षप्रमुख
मा. अशोकराव आल्हाट
यांनी महायुतीच्या सर्व नेत्यांचे, शिवसेना पक्षाचे तसेच जनतेचे आभार मानले असून, पुढील काळातही लोकहितासाठी महायुतीसोबत ठामपणे उभे राहणार असल्याचे स्पष्ट केले.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant