समाजप्रबोधन व लोकचळवळ हीच माध्यमांची खरी भूमिका – नारायण पांचाळ (जेयूएम अध्यक्ष)
“समाजप्रबोधन करणे आणि अन्यायाच्या विरोधात लोकांचा आवाज बनणे हीच माध्यमांची खरी भूमिका असली पाहिजे,” असे प्रतिपादन जनता जनार्दन मंच (जेयूएम)चे अध्यक्ष श्री. नारायण पांचाळ यांनी केले. पाचल येथे मराठी पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
मराठी भाषेतील पहिले नियतकालिक ‘दर्पण’ आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले. त्या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी मराठी पत्रकार दिन साजरा केला जातो. यावर्षी दर्पण सुरू होऊन १९४ वर्षे पूर्ण होत आहेत. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात पत्रकारांनी आपल्या लेखणीद्वारे इंग्रजांविरोधात लढा दिला. त्याचप्रमाणे आजच्या पत्रकारांनीही सत्यासाठी आणि अन्यायाविरुद्ध निर्भीडपणे आवाज उठवावा, असे आवाहन श्री. पांचाळ यांनी केले.
ते पुढे म्हणाले की, ‘दर्पण’ हे मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रसिद्ध होत असल्यामुळे त्या काळात क्रांतीला चालना मिळाली. आज मराठी भाषा समृद्ध असून तिला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे. ही भाषा आपल्या दैनंदिन व्यवहाराची व संभाषणाची भाषा व्हावी आणि तिच्यावर कोणत्याही प्रकारचे आक्रमण होऊ नये, यासाठी सर्वांनी जागरूक राहणे गरजेचे आहे.
हा कार्यक्रम राजापूर तालुका ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंकुश पोटले होते. यावेळी संघाचे सचिव राजेंद्र दळवी, खजिनदार नितीश खानविलकर, सहसचिव पांडुरंग माने, अरविंद वरेकर, संतोष चव्हाण, योगेश ऐनारकर, राजेंद्र साळवी (बाळू) तसेच ज्येष्ठ नागरिक वसंत चव्हाण व राजाभाऊ नारकर आदी मान्यवर उपस्थित होते.
मराठी पत्रकारितेच्या उज्ज्वल परंपरेचा वारसा जपत समाजहितासाठी कार्य करण्याचा निर्धार यावेळी उपस्थित पत्रकारांनी व्यक्त केला.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant