माझगाव पुन्हा भगवा करणार!
यामिनीताई जाधव यांच्या उमेदवारीसाठी शक्तीप्रदर्शन
मुंबईच्या माझगाव परिसरात पुन्हा एकदा शिवसैनिकांची ताकद, निष्ठा आणि भगव्याची लाट दिसणार आहे. सोमवार, दिनांक 29 डिसेंबर 2025 रोजी सकाळी ठीक 10 वाजता शिवसेना उपनेते, लोकनेते, माजी नगरसेवक व माजी स्थायी समिती अध्यक्ष श्री. यशवंत जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेच्या कडव्या, निष्ठावान उमेदवार सौ. यामिनीताई यशवंत जाधव यांच्या निवडणूक अर्ज भरण्यासाठी भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.
शाखा क्रमांक 209/210 येथून वाजत-गाजत, ढोल-ताशांच्या गजरात, “जय भवानी – जय शिवाजी”, “शिवसेना जिंदाबाद”च्या घोषणांनी आसमंत दुमदुमणार असून, ही मिरवणूक म्हणजे विजयाचा शंखनाद असल्याचे शिवसैनिक सांगत आहेत.
जनतेच्या सुख-दुःखात नेहमी धावून जाणाऱ्या, माझगावच्या विकासासाठी अहोरात्र झटणाऱ्या जाधव परिवारावर नागरिकांचा अढळ विश्वास असून, महिला नेतृत्वाच्या रूपाने सौ. यामिनीताई जाधव यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
ही केवळ निवडणूक नाही, तर माझगावच्या स्वाभिमानाची लढाई असून, प्रत्येक शिवसैनिक व मतदाराने या ऐतिहासिक क्षणी सहभागी होऊन विजयाच्या सुरुवातीलाच भगवा फडकवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant