ठाणेकरांसाठी मोठी बातमी! कासारवडवली उड्डाणपूल अखेर खुला; सुसाट होणार प्रवास
ठाणेकरांसाठी मोठी बातमी! कासारवडवली उड्डाणपूल अखेर खुला; सुसाट होणार प्रवास
ठाणे - मुंबई आणि नवी मुंबईकांसाठी आनंदाची बातमी आहे. ठाण्याच्या घोडबंदर भागातील कासारवडवली येथील उड्डाणपुलावरील एक मार्गिका मंगळवारी वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. या उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू झाल्याने कासारवडवली आणि आनंदनगर भागातील नागरिकांना वाहतूक कोंडी दूर होणार आहे. यामुळे या भागातून प्रवास कऱणाऱ्या वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
दोन ते तीन महिन्यांत दुसरी मार्गिका खुली होणार
गेल्या काही महिन्यांपासून संथगतीने सुरू असलेल्या या पुलाचे काम नुकतेच पूर्ण झाले. त्यानंतर मंगळवारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते या पुलाचे लोकार्पण करण्यात आले. यामुळे ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. घोडबंदर ते ठाणे या दुसऱ्या मार्गिकेचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. सरनाईक यांनी येत्या दोन ते तीन महिन्यांत दुसरी मार्गिका देखील वाहतुकीसाठी खुली केली जाईल अशी माहिती यावेळी बोलताना दिली.
कासारवडवली पुलामुळे वाहतुक वेगवान
मुंबई, गुजरात, नाशिक आणि जेएनपीटी बंदरातून वाहतूक करणारी अवजड वाहने घोडबंदर मार्गे ये-जा करतात. याशिवाय घोडबंदर परिसरात राहणाऱ्या नागरिकांची वाहनेही याच मार्गाचा वापर करतात. त्यामुळे घोडबंदर मार्ग वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. गेल्या काही महिन्यांपासून कासारवडवली आणि ओवळा भागात उड्डाणपुलाच्या निर्मितीचे काम सुरू होते. ओवळा उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर तो काही दिवसांपूर्वीच वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता, मात्र, कासारवडवली पुलाचे काम पूर्ण झाले नव्हते. आज या पुलाची एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आल्याने या भागातील मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी दूर होणार आहे.
दळणवळण क्षमता वाढवणारा प्रकल्प
मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने म्हटले की, हा प्रकल्प सुसंलग्न मुंबई महानगराच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. कासारवडवली उड्डाणपुलाचा पहिला टप्पा आता प्रवाशांच्या सेवेसाठी खुला केला असून या पुलामुळे ठाणे, मुंबई, नवी मुंबई, भिवंडी, वसई, विरार यामधील वाहतूक अधिक सुलभ होईल. तसेच घोडबंदर रोडवरील अवजड वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी लक्षणीयरीत्या कमी होईल. जेएनपीटी, वाशी आणि ठाणे दरम्यानच्या आंतरराज्यीय व कार्यालयीन वेळेतील प्रवाशांसाठी प्रवास अधिक गतीमान झाला असून या पुलामुळे प्रवास अधिक सुलभ, सुखकर आणि जलद गतीने करणे शक्य होणार आहे, असे एमएमआरडीएने म्हटले आहे.
कासारवडवली उड्डाणपुलाचे प्रमुख फायदे
- गायमुख ते वाघबीळ दरम्यान नवीन भूमिगत मार्गामुळे अखंड व सुरळीत वाहतूक शक्य होईल.
- घोडबंदर रोडवरील प्रवासाचा कालावधी कमी होऊन सरासरी वेग वाढेल.
- दररोज प्रवास करणारे नागरिक व मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना मोठा दिलासा मिळेल.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 9 JULY TO...
- 09 July, 2026
ADHARSH SWARAJ 2 JULY TO...
- 02 July, 2026
ADHARSH SWARAJ 25 JUNE...
- 25 June, 2026
ADHARSH SWARAJ 18 JUNE...
- 18 June, 2026
ADHARSH SWARAJ 4 JUNE TO...
- 04 June, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant