गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम
गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम
धारावीतील वार्ड क्र. 185 मध्ये बुधवार, दि. 25 जून 2025 रोजी समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी भास्कर शेट्टी यांच्या हस्ते मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यामुळे समाजसेवेच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल टाकत, या उपक्रमामुळे अनेक गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाचा प्रवास अधिक सुलभ होण्यास मदत मिळाली.
या उपक्रमात इयत्ता 11 वी पासून ते पदवी अभ्यासक्रमापर्यंतच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक पुस्तकांचे मोफत वाटप करण्यात आले. श्रीसिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या माध्यमातून हे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले.
तसेच, भास्कर शेट्टी (ट्रस्टी, सिद्धिविनायक मंदिर) यांच्या तर्फे विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वरूपात कॉलेज बॅग्स, लेखन साहित्य व वह्यांचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी भास्कर शेट्टी यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना, पालकांना आणि शिवसैनिकांना येत्या काळातही अशा प्रकारच्या शैक्षणिक मदतीसाठी सातत्याने कार्यरत राहण्याचे आश्वासन दिले. त्यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छाही दिल्या.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
आम्हाला फॉलो करा
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर