NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

आनंदाची बातमी: सिडकोकडून 22 हजार घरांसाठी लॉटरी, सर्वसामान्यांचे घराचं स्वप्न पूर्ण होणार

आनंदाची बातमी: सिडकोकडून 22 हजार घरांसाठी लॉटरी, सर्वसामान्यांचे घराचं स्वप्न पूर्ण होणार

CIDCO Lottery for affordable homes: मुंबई, ठाणे, नवी मुंबई सारख्या शहरांमध्ये आपले स्वत:चे आणि हक्काचे घर असावे असे प्रत्येकाला वाटत असते. मात्र, या शहरांमध्ये घरांच्या किमती गगनाला भिडल्याने सर्वसामान्यांना घर खरेदी करणे शक्य होत नाही. पण सर्वसामान्यांच्या घर खरेदीचं हेच स्वप्न सिडको, म्हाडा यासारख्या संस्था करत असतात. सर्वसामान्यांना परवडणारी, हक्काची आणि दर्जेदार घरे मिळाली पाहिजेत, त्याचे जीवनमान उंचावले पाहिजे, सर्वांचे घरांचे स्वप्न पूर्ण झाले पाहिजे. यासाठी सिडको, म्हाडा यांसारख्या संस्था दरवर्षी घरांची सोडत काढत असतं.

आता नवी मुंबईत सिडकोकडून तब्बल 22 हजार घरांच्या विक्रीसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे. या लॉटरीमुळे तुम्हाला परडवणाऱ्या किमतीत घर उपलब्ध होणार आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जून महिन्याच्या अखेरिस सिडकोकडून ही 22000 घरांच्या विक्रीसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे.

सिडकोने "माझे पसंतीचे सिडको घर" या महागृहनिर्माण योजनेचा प्रारंभ ऑक्टोबर महिन्यात केला. या योजनेच्या अंतर्गत 26000 घरे विक्रीसाठी उपलब्ध करुन दिली. या घरांच्या किमती सिडकोने नुकत्याच जाहीर केल्या. मात्र, घरांच्या किमती पाहून अनेकांना धक्काच बसला. सिडकोची घरे परवडणारी आहेत की महागडी हेच कळेनासे झाले. त्यामुळे "माझे पसंतीचे सिडको घर" या महागृहनिर्माण योजनेसाठी नोंदणी केलेल्या अर्जदारांचा हिरमोड झाला. सिडकोच्या या लॉटरीतील अनेक घरे विक्रीविना पडून आहेत. या योजनेतील 16 हजार घरे आणि त्यासोबतच नवीन 6000 घरे अशा एकूण 22000 घरांची लॉटरी सिडकोकडून काढण्यात येणार आहे.


घरे नेमकी कोणत्या परिसरात?

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सिडकोकडून काढण्यात येणाऱ्या या लॉटरीतील 22000 घरे नवी मुंबईतील विविध नोडमध्ये उपलब्ध आहेत. बुधवारी सिडकोच्या संचालक मंडळाच्या बैठकीत या लॉटरीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. त्यानंतर लॉटरीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल. सिडकोच्या या लॉटरीतील घरे नवी मुंबईतील वाशी, जुईनगर, खारघर तर पनवेलमधील तळोजा, द्रोणागिरी या नोडमध्ये असण्याची शक्यता आहे.


रिपोर्टर

  • Karishma Sawant
    Karishma Sawant

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Karishma Sawant

संबंधित पोस्ट