नारायण सेवा संस्थानतर्फे मुंबईत ४१९ दिव्यांगांना विनामूल्य कृत्रिम हात-पाय वितरित
नारायण सेवा संस्थानतर्फे मुंबईत ४१९ दिव्यांगांना विनामूल्य कृत्रिम हात-पाय वितरित
मुंबई: दिव्यांग आणि मानवसेवेसाठी प्रसिद्ध असलेल्या उदयपूरच्या नारायण सेवा संस्थानतर्फे मुंबईतील दिव्यांग बांधवांसाठी रविवार, ८ जून २०२५ रोजी विनामूल्य नारायण लिम्ब आणि कॅलिपर्स फिटमेंट शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर निको हॉल, वडाळा उद्योग भवनाजवळ, दादर पूर्व, मुंबई येथे भरविण्यात आले होते. पूर्वनिवड करण्यात आलेल्या दिव्यांगांना या शिबिराचा लाभ देण्यात आला.
संस्थेच्या मुंबई शाखेचे अध्यक्ष महेश अग्रवाल यांनी सांगितले की, संस्थान मागील ४० वर्षांपासून विविध राज्यांतील दिव्यांग बांधवांना त्यांच्या घराजवळ सेवांचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्नशील आहे. याच उपक्रमांतर्गत २३ मार्च रोजी मुंबईत विनामूल्य नारायण लिम्ब मापन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात ५०० हून अधिक दिव्यांग सहभागी झाले होते. त्यापैकी ४१९ जणांना रस्ते अपघात किंवा इतर दुर्घटनांमुळे हात-पाय गमावावे लागले होते. त्यांची निवड करून त्यांचे मापन व साच्यांचे काम करण्यात आले.
या विनामूल्य कृत्रिम हात-पाय वितरण शिबिरात मुंबईतील अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी संस्थेचे संस्थापक पद्मश्री कैलाश मानव यांची नात संस्थेच्या डायरेक्टर पलक अग्रवाल आणि महर्षी अग्रवाल यांची विशेष उपस्थिती होती. कथावाचिका यति किशोरी आणि टाटा कंपनीचे प्रतिनिधी स्वयंसेवक म्हणून सहभागी झाले. महीम जैन यांनी मंच संचालन करत उपस्थितांचे मनोरंजन केले. अनेक उद्योगपतींनी उदयपूरमध्ये निर्माण होणाऱ्या हॉस्पिटलसाठी देणगी दिली. सर्व उपस्थित अतिथींना साफा, पगडी आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.
या शिबिरात दिव्यांगांना विनामूल्य कृत्रिम हात-पाय देण्यात आले, तसेच फिजिओथेरपिस्टच्या टीमकडून त्यांचा वापर कसा करावा हे बारकाईने शिकविण्यात आले. शिबिराचे यश हे उत्कृष्ट व्यवस्थापन हे मुख्य वैशिष्ट्य होते, जेणेकरून कोणत्याही दिव्यांग किंवा त्यांच्या कुटुंबीयांना गैरसोयीचा सामना करावा लागू नये.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade