डीपीडीसीचा आर्थिक निधी मुंबईसाठी अपुरा, निधी वाढवून द्या
डीपीडीसीचा आर्थिक निधी मुंबईसाठी अपुरा, निधी वाढवून द्या
मुंबई - मुंबईसाठी डीपीडीसीचा आर्थिक निधी केवळ ५६ कोटींनी वाढवण्यात आला असून तो मुंबईतील नागरिकांच्या गरजेनुसार विकासकामांसाठी पुरेसा नाही. सरकारने हा निधी वाढवावा तसेच मागील डीपीडीसी बैठकीपासून आतापर्यंत झालेल्या कामांबाबतचा कारवाई अहवाल (Action Taken Report) सादर करावी अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदास वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
याविषयावर बोलताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, चांदिवलीत सार्वजनिक मागणीनुसार मिनी अग्निशमन केंद्र (फायर स्टेशन) अद्यावत करण्याची गरज आहे. मुंबईतील अपूर्ण व निकृष्ट दर्जाचं नालेसफाईचं काम ठिकठिकाणी सुरु असलेल्या बेढब आणि अनियोजित काँक्रीटीकरणामुळे नागरिकांचे होणारे हाल. एससीएलआर मार्गावरील वाहतूक कोंडी– प्रशासनाने ४ ट्रॅफिक कॉन्स्टेबल आणि काही रायडर तैनात केल्याचे सांगितले, पण प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही. प्रशासनाने हा प्रश्न तातडीने सोडवावा. वांद्रे परिसरात प्रस्तावित नवीन रस्त्यांचे बांधकाम व काही विद्यमान रस्त्यांचे रुंदीकरण यासंबंधी वर्षा गायकवाड यांनी प्रश्न विचारले.
चुनाभट्टीतील चाळींमध्ये कुर्ला एलिव्हेटेड रोड प्रकल्पग्रस्त रहिवाशांना भेडसावणाऱ्या समस्या. वाकोला, वांद्रे आणि सांताक्रूझ येथील मोकळ्या जागांशी संबंधित प्रश्न, सांताक्रूझ आणि वाकोला येथील रस्त्याच्या कामांना होणारा उशीर, भारत नगरमधील सरकारी दवाखान्याच्या पुनर्बांधणीचा विलंब, भाभा रुग्णालयातील आणि इतर उपनगरांतील रुग्णालयात अत्यंत खराब सुविधा याशिवाय नागरिकांना दिल्या जाणाऱ्या मूलभूत सेवांमधील गोंधळ आणि अकार्यक्षमता याबाबतही अनेक मुद्दे उपस्थित केले अशी माहिती खासदार वर्षा गायकवाड यांनी दिली.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade