इंडिगो एअरलाईन्सच्या देशभरातील २६ हजार कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा निर्णय
इंडिगो एअरलाईन्सच्या देशभरातील २६ हजार कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा निर्णय
मुंबई -इंडिगो एअरलाईन्सच्या देशभरातील सुमारे २६ हजार कर्मचाऱ्यांना वर्षातून 2 वेळा वेतनवाढ देण्याचा महत्वपूर्ण निर्णय कंपनीच्या व्यवस्थापन समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी झालेल्या सकारात्मक चर्चेअंती घेण्यात आल्याची माहिती भाजपचे कार्यकारी अध्यक्ष आणि अखिल भारतीय कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिली.
या संदर्भात आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की, विमानतळावरील विविध कंपन्यांच्या कामगारांच्या अनेक समस्या गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित होत्या. पंरतू, त्यांच्या समस्यांकडे सातत्याने दुर्लक्ष झाले.
याचसंदर्भात विमानतळावरील इंडिगो एअरलाईन्स या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी नुकताच भाजप मध्ये प्रवेश केला व आपल्या न्याय मागण्या मांडल्या भाजपाकडे मांडल्या होत्या. त्यामुळे या सर्व कर्मचा-यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका घेत या गंभीर विषयाच्या अनुषंगाने भाजपच्या माध्यमातून कंपनीच्या व्यवस्थापन समितीच्या वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांशी सातत्याने चर्चा करण्यात आली.
कंपनी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या या रास्त होत्या, त्यामुळे कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे या बाबत यशस्वी तोडगा काढण्याच्या दृष्टीने गेले काही महिने व्यवस्थापन समितीच्या वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांशी वारंवार बैठका घेण्यात आल्या. अखेर, कर्मचाऱ्यांचे हित ध्यानात घेऊन इंडिया एअरलाईन्स कंपनीच्या मुंबई व गोवा सह देशभरातील सुमारे 26 हजार कर्मचाऱ्यांना वर्षातून 2 वेळा वेतनवाढ देण्याची भाजपची मागणी मान्य करण्यात आली.
त्या दृष्टीने प्रक्रिया करुन निर्णय घेण्यात आला. याचा लाभ देशभरातील कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांना मिळणार असून त्यांच्यावरील गेले काही वर्षे सूरु असलेला अन्याय दूर झालेला आहे, असे रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने नेहमीच कामगारांच्या हिताचा विचार केला आणि कोणत्याही कामगारांवर अन्याय होणार नाही याची काळजी पक्षाने घेतली. त्यामुळे इंडिगो कंपनीच्या कर्मचा-यांच्या मागण्यांसाठी कंपनीच्या व्यवस्थापन समिती समवेत झालेल्या चर्चेअंती यशस्वी तोडगा निघाला असून प्रत्येक कामगारांना चांगली पगारवाढ मिळेल याची दक्षता घेण्यात आल्याचे रविंद्र चव्हाण यांनी यावेळी सांगितले.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant