मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

विश्वासदर्शक ठराव हरल्याने पदावरून पायउतार झाले या देशाचे पंतप्रधान

विश्वासदर्शक ठराव हरल्याने पदावरून पायउतार झाले या देशाचे पंतप्रधान

काठमांडू -: सध्या जगात सर्वत्र सत्ता बदलाचे वारे वाहत आहेत. भारताच्या शेजारील नेपाळमध्येही आता सत्ता पालट झाला आहे. पंतप्रधान पुष्प कमल दहल यांनी २५ डिसेंबर २०२२ रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी पाच वेळा अविश्वास ठरावाचा सामना केला आहे. अखेर १९ महिन्यांनंतर त्यांचं सरकार आज कोसळलं आहे. ६९ वर्षीय प्रचंड यांना २७५ सदस्यीय प्रतिनिधी सभेत केवळ ६३ मतं मिळाली आहेत. अविश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने १९४ मतं पडली. विश्वासदर्शक ठराव जिंकण्यासाठी किमान १३८ मतं मिळवणं आवश्यक होतं.

नेपाळच्या कनिष्ठ सभागृहातील सर्वात मोठी पार्टी नेपाळी काँग्रेसबरोबर वाटाघाटी केल्यानंतर के. पी. शर्मा ओली यांच्या पक्षाने सीएपीएन-यूएमएल विद्यमान सत्तारूढ युतीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. प्रचंड यांच्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळकडे (माओवादी सेंटर) केवळ ३२ जागा आहेत. तर सीएपीएन-यूएमएलकडे ७८ व नेपाळी काँग्रेसकडे ८९ जागा आहेत. त्यामुळे आता देशात नेपाळी काँग्रेस व सीएपीएन-यूएमएल हे दोन पक्ष मिळून सत्तास्थापन करतील. या दोन पक्षांकडे मिळून १६७ सदस्यांची ताकद आहे.


रिपोर्टर

  • Mukesh S. Dhawade
    Mukesh S. Dhawade

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Mukesh S. Dhawade

संबंधित पोस्ट