मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

ज्येष्ठांसोबत वेळ घालवण्यासाठी या राज्यात मिळणार विशेष सुट्टी

ज्येष्ठांसोबत वेळ घालवण्यासाठी या राज्यात मिळणार विशेष सुट्टी

दिसपूर - आई-वडील व सासू-सासऱ्यांसोबत वेळ घालवण्यासाठी, त्यांच्यासोबत फिरण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना विशेष सुट्टी देण्याचा निर्णय आसाम सरकारनं घेतला आहे. कौटुंबिक संबंध दृढ करण्याचा उद्देश यामागे आहे. आसाम सरकारनं दिलेली ही रजा दोन दिवसांची विशेष प्रासंगिक रजा असेल. ही रजा नोव्हेंबर महिन्यात मिळेल. मुख्यमंत्री हिंमता बिस्व सरमा यांच्या कार्यालयानं (CMO) गुरुवारी ही माहिती दिली. विशेष रजा वैयक्तिक मनोरंजनासाठी वापरली जाऊ शकत नाही. तसंच, ज्या कर्मचाऱ्यांना आई-वडील किंवा सासरे नाहीत त्यांना रजेचा हक्क मिळणार नाही, असंही सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे.

कामाच्या व्यग्रतेत अनेकदा वृद्ध आई-वडील व इतर कुटुंबीय दुर्लक्षित राहतात. आठवड्याला एक सुट्टी मिळाली तरी ती कर्मचाऱ्यांच्या विश्रांतीमध्ये जाते किंवा या सुट्टीत कर्मचारी स्वत:चे स्वतंत्र प्लान ठरवतात. अशा वेळी घरातील वृद्धांची कुचंबणा होते. ही कुचंबणा दूर करण्यासाठी, त्यांचा आदर-सन्मान करण्यासाठी व त्यांची काळजी घेण्याच्या दृष्टीनं ही विशेष रजा महत्त्वाची मानली जात आहे.

यंदाची सुट्टी कधी घेता येईल हे देखील मुख्यमंत्री कार्यालयानं स्पष्ट केलं आहे. यंदा येत्या ७ नोव्हेंबरला छठपूजा आहे. त्यानंतर मध्ये ८ तारखेचा दिवस आहे. त्याला लागून ९ नोव्हेंबरला दुसरा शनिवार आणि १० नोव्हेंबरला रविवार आहे. त्यामुळं यंदा ७ व ८ नोव्हेंबरला ही सुट्टी घेता येणार आहे. अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणारे कर्मचारी टप्प्याटप्प्याने रजा घेऊ शकतात. मुख्यमंत्री हिंमता बिस्व सरमा यांनी २०२१ मध्ये पदभार स्वीकारल्यानंतर स्वातंत्र्यदिनी केलेल्या पहिल्या भाषणात या विशेष सुट्ट्यांची घोषणा केली होती.


रिपोर्टर

  • Mukesh S. Dhawade
    Mukesh S. Dhawade

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Mukesh S. Dhawade

संबंधित पोस्ट