जम्मू कश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत ५ जवान शहीद
जम्मू कश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत ५ जवान शहीद
जम्मू - जम्मू-काश्मीरमध्ये हिंसाचार वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून दहशतवादी हल्ले होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. आता जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात पुन्हा एकदा दहशतवादी आणि भारतीय लष्करामध्ये चकमक झाली आहे. या चकमकीत भारतीय लष्कराच्या एका अधिकाऱ्यासह चार जवान शहीद झाले आहेत.
डोडा जिल्ह्यात सोमवारी रात्री झालेल्या या चकमकीसंदर्भात लष्कराच्या अधिकाऱ्यांकडून माहिती देण्यात आली आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात चार जवान गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान एका अधिकाऱ्यासह चार जवान शहीद झाले.
दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील डोडा परिसरात अद्यापही लष्काराचे जवान आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरू असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. भारतीय लष्कराचे जवान आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्यावतीने दहशतवाद्यांच्या विरोधात संयुक्त कारवाई करण्यात येत आहे.
या कारवाई दरम्यान सोमवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास दहशतवाद्यांबरोबर चकमक झाली. यावेळी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात लष्कराच्या एका अधिकाऱ्यासह चार जवान शहीद झाले. दरम्यान, या परिसरात आता जवानांचा अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya