मतदार यादीत नाव टाकण्यासाठी शेवटची संधी
छायाचित्र नसलेली नावे मतदार यादीतून वगळणार
पनवेल : पनवेल विधानसभा मतदारसंघात एकूण 570 मतदार यादीभागामध्ये 46066 मतदारांचे फोटो मतदार यादीत नसल्याचे आढळून आले आहे. ज्या मतदारांचे छायाचित्र मतदार यादीत नाही, अशा मतदारांनी आपले फोटो 31 जुलै पर्यंत मतदान केंद्रस्तरीयअधिकारी / तलाठी किंवा निवडणुक शाखा तहसिलदार कार्यालय पनवेल येथे जमा केले नाहीत तर मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात येणार आहेत.
भारत निवडणूक आयोगाने 01 जानेवारी 2021 या अर्हता दिनांकावर आधारीत राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाच्या छायाचित्र मतदार यादीचा संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम जाहिर केला आहे. या कार्यक्रमांतर्गत 100 टक्के शुध्द मतदार यादी तयार करण्याची मोहीम भारतीय निवडणूक आयोगाने सुरु केली आहे.
188 पनवेल विधानसभा मतदारसंघात 570 मतदार यादीभागामध्ये 46066 मतदारांचे फोटो मतदार यादीत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या मतदारांची नावे वगळण्याबाबतची नोटीस 24 जुलै 2021 रोजी दैनिक पुढारी, दैनिक सकाळ, दैनिक किल्ले रायगड, दैनिक रायगड नगरी, दैनिक रायगड टाईम्स, दैनिक कृषीवल, दैनिक नवराष्ट्र, दैनिक राम प्रहर, दैनिक वादळवार व दिनांक 25/07/2021 रोजी दैनिक लोकमत, दैनिक निर्भिड लेख या वृत्तपत्रामध् प्रसिद्ध करण्यात आली आहे. तरी मतदारांनी त्यांचे नाव नोंदणी, दुरुस्ती अथवा वगळणी बाबत त्यांचे यादीभागाशी संबंधित बि.एल.ओ., तलाठी किंवा निवडणुक शाखा तहसिलदार कार्यालय पनवेल येथे अथवा ीरळसरव.पळल.ळप संकेतस्थळास कृपया भेट देण्याबाबत तसेच त्यांचे फोटो व अधिवासाचा पुरावा 31 जुलै 2021 पर्यंत कृपया सादर करावा असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी 188 पनवेल विधानसभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी पनवेल विभाग यांनी केले आहे.
- पडताळणी प्रक्रियेतही गोंधळ
46 हजार 66 नावे एकाच वर्तमानपत्रात तातडीने जाहीर प्रसिद्ध करणे अशक्य असल्याने निवडणूक विभागातील काही अधिकार्यांनी शक्कल लढवून विविध 12 वर्तमानपत्रांत जाहिरात देऊन मतदारांमध्ये जनजागृती करण्याचे नियोजन करण्यात आले. मात्र या नोटिसीमुळे सामान्य मतदारांमध्ये जागरूकता येण्याऐवजी त्यांच्या संभ्रमात भर पडली. माझे नाव या यादीत नसेल ना म्हणून या मतदारांनी या वर्तमानपत्रांचा शोध घेतला. काहींना यादी मिळाली तर काहींना मिळालीच नाही. त्यामुळे समाजमाध्यमातून या प्रकारचा निषेध करण्यात आला. निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ आधुनिक नसल्याने हा सर्व जाहिरात गोंधळ पनवेलमध्ये झाला आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya