आषाढी वारीच्या पालखी मार्ग सुविधेत महत्त्वाचे बदल या AI मुळे बँकिंग प्रणालीवर सायबर हल्ल्याचा धोका आठवड्यातून तीन दिवस दिवा-चिपळूण अनारक्षित मेमू सेवा सायली सातघरेला सर्वोत्तम महिला खेळाडूचा पुरस्कार – सुभाष हरचेकर ट्रम्प यांचे भारताला नरक द्वार म्हणण्यावर घुमजाव अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार शर्तभंग झालेल्या सिडको, नैनाकडील जागा सरकारजमा करण्याचे महसूलमंत्र्यांचे आदेश! विरोध झुगारून भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाचा २३ कोटींचा प्रस्ताव मंजूर! हौशी गायकांसाठी ‘पुणे आयडॉल २०२६’; सोमेश्वर फाउंडेशनचा उपक्रम बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘मार्ग प्रणाली’चा महापौर श्रीमती रितू तावडे यांच्या हस्ते शुभारंभ राजेश मोरे यांची शिवडी विभाग अध्यक्ष पदी निवड लोकार्पणानंतर मुंबई मेट्रो लाईन 2B वर पहिल्यांदाच व्यावसायिक चित्रीकरण केंद्र सरकारच्या आयगॉट- ‘साधना सप्ताह 2026’ मध्ये महाराष्ट्र अव्वल मेट्रो मार्गिका-५ अ, टप्पा एक आणि टप्पा दोनला मंजुरी मराठी सक्तीच्या विरोधात 15 लाख रिक्षाचालक जाणार संपावर ओव्हरटाइमसाठी कर्मचाऱ्यांना मिळणार दुप्पट मोबदला खाशाबा जाधवांना मरणोत्तर पद्मविभूषण देण्याचे न्यायालयाचे आदेश युद्धामुळे झालेल्या नुकसानासाठी UAE ने अमेरिकेकडे मागितली आर्थिक गॅरंटी एसटी सौर ऊर्जेचा पहिला टप्पा सुरू; २.५७ मेगावॉट ग्रीड सोलर प्रकल्पास मंजुरी कल्याण-डोंबिवली मनपा क्षेत्रात भीषण पाणी टंचाई या प्रवाशांना विमानामध्ये ‘नो एन्ट्री’ पेन्शन क्षेत्रात येणार १००% FDI नगरसेवकांना १ लाख मानधनाची मागणी ! RBI ने हटवले रुपयाच्या व्यापारावरील निर्बंध एल निनोच्या पार्श्वभूमीवर यंदाचा खरीप हंगाम अत्यंत महत्त्वाचा : कृषी मंत्री भरणे काळ्या हळदीला सोन्याचा भाव! तब्बल २१,१५० उच्चांकी दर होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार राज्यात 20-22 एप्रिलदरम्यान वादळी पावसाची शक्यता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ समृद्धी महामार्गावरून १,२४० कोटींची विक्रमी टोल वसूली खरात प्रकरणातील महत्त्वाच्या साक्षीदाराचा अपघाती मृत्यू उत्तरेच महत्व वाढवण्याचा प्रयत्न,राज ठाकरे यांचा आरोप गडचिरोली जिल्ह्यात प्रथमच धावली रेल्वे कोल्हापूरच्या महापौर श्रीमती रूपाराणी निकम यांनी मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांची सदिच्छा भेट घेतली चर्नी रोड स्थानकावर भीम जयंतीचा झाला जल्लोष ‘सीबीएसई’ दहावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा महापौर श्रीमती रितू तावडे, महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी केला सत्कार अमेरिकेत अणू-अंतराळ संशोधन करणारे 5 शास्त्रज्ञ गायब २०२६- २७ पीक कर्जासाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी शेतकरी महिलेने सुरू केली आशिया खंडातील पहिली चुंबक बनवणारी कंपनी रितेश देशमुखच्या राजा शिवाजी’चं पहिलंच गाणं रिलीज पश्चिम उपनगरांमधील नालेस्‍वच्‍छतेची कामे प्रगतिपथावर मराठी उद्योजकाचा अमेरिकेच्या हार्वर्डमध्ये झेंडा- ‘तौराल इंडिया’ व भरत गीते यांची यशोगाथा हार्वर्ड बिझनेस स्कुलच्या अभ्यासक्रमात पु. ल. देशपांडे अकादमीत रंगणार स्त्री गझलकारांचा गझल मुशायरा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे भव्य प्रदर्शन…. मुंबई अग्निशमन दलात सेवा बजावताना शहीद वीर अग्निशमन अधिकारी व जवानांना ‘राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिन’ निमित्ताने श्रद्धांजली अर्पण. आता इंटरनेटशिवायही करता येईल UPI Payment राज्यासह देशात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस IMD मुंबईत होणार आयईएस स्कील टेक विद्यापीठ ज्येष्ठ गायिका आशा भोसले अनंतात विलीन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली माती, जोडते दलित सवर्णांची नाती – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले जड वाहनांना ड्रायव्हर असिस्ट सिस्टिम’ बंधनकारक ज्येष्ठ कबड्डीपटूंचा झाला डिलाईल रोड येथे सन्मान, आमदार सुनील शिंदे यांचा पुढाकार महात्मा फुले यांना द्विशताब्दी जयंती वर्षातच ‘भारतरत्न’ मिळावा यासाठी विशेष आग्रह धरणार: खा. ज्योती वाघमारे मध्य रेल्वे मार्गावर लवकरच बंद दरवाज्याची पहिली नॉन AC लोकल ट्रेन पुणे शहरात डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त ‘नो डीजे’ मिरवणूक राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये थेट सरपंचपदासाठी 28 एप्रिलला मतदान 10 हजारांवरील UPI पेमेंटवर लागेल एक तासाचा ‘ब्रेक’ कोकणासाठी ४ वातानुकूलित विशेष रेल्वेगाड्या आसाम आणि पुदुचेरीमध्ये इतिहासातील सर्वाधिक मतदानाची नोंद कंपनी धर्मांतर प्रकरण: पाच आरोपी न्यायालयीन कोठडीत, एकाला पोलीस कोठडी… विधानसभा निवडणुकीतील ईव्हीएमच्या तपासणीचे उच्च न्यायालयाचे आदेश… यावर्षीचा महामानव डॉ. आंबेडकर जयंती उत्सव ठरणार संस्मरणीय: परशुराम वाडेकर बारामतीत काँग्रेसची माघार मात्र पाठिंबा नाही आता OTT वर धडकणार ‘धुरंधर 2’ राज्यातील सर्व जिल्ह्यांत एका फोनवर हजर होणार फिरते रुग्णालय NEP नुसार नवीन शैक्षणिक वर्षांपासून ४ वर्षांचा पदवी अभ्यासक्रम टोल प्लाझावर आता रोख रकमेवर बंदी इराण – अमेरिका युद्धविरामामुळे तेलाच्या किंमतीत घसरण Netflix ने खास लहान मुलांसाठी लाँच केले गेमिंग ॲप मेट्रो लाईन-९चा पहिला टप्पा सुरू; मुंबई-मीरा-भाईंदर प्रवास होणार जलद मुंबई मेट्रो २बीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण व पॉड टॅक्सी प्रकल्पाचे ई भूमीपूजन संपन्न पाकिस्तानात रात्री 8 नंतर लागणार लॉकडाऊन डॉ. गजानन रत्नपारखी यांची अध्यक्षपदी नियुक्ती दिल्ली विधानसभेचे बॅरियर तोडून आत घुसली कार मे अखेरपर्यंत Air India कडून इस्रायलची विमानसेवा रद्द मुंबई ते सिंधुदुर्ग रो-रो बोट सेवा 35 दिवसांतच ठप्प पश्चिम रेल्वेच्या मार्गावर आता १२ डब्यांऐवजी १५ डब्यांच्या लोकल महानगरपालिकेतील १००० कोटी रुपयांची टेंडर फक्त रद्द करुन चालणार नाही; स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात अवतरले अंदमान डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 120 वा लग्नसोहळा भायखळ्यात जल्लोषात मराठी अभिनेत्रीने लिहिलेल्या कादंबरीवर आधारित वेबसरिज लवकरच OTT वर मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या अध्यक्षपदी पुन्हा शरद पवार दहिसर भाईंदर मेट्रोला आता सात एप्रिलचा मुहूर्त सहा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पुन्हा उघडले ‘भारतमाता’ सिनेमागृह मुंबई महापालिकेतील अपात्र महिलांना मिळणार शिलाई मशीन उल्हासनगरमध्ये शांतीनगर स्मशानभूमीतील आंबेडकरांचा पुतळा स्थलांतरित करण्याची मागणी दूषित पाणीपुरवठ्याच्या तक्रारींचा तातडीने व प्राधान्याने निपटारा करण्याचे निर्देश गॅस टंचाईमुळे बेस्टची उपाहारगृहे बंद अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषी मंत्री शेतक-यांच्या बांधावर भोंदूबाबा अशोक खरातला दुसऱ्या गुन्ह्यात पुन्हा अटक पुण्याला आवकाळी पावसानं झोडपलं गोकुळ दूध संघाची होणार चौकशी कुवेत एअरवेजच्या विमानातून आले 20 भारतीयांचे मृतदेह व्यावसायिक सिलिंडर ₹218 ने महागला विमान प्रवास महागणार, जेट इंधनाच्या किमती दुप्पट AI डेटा केंद्रांमुळे वाढत आहे पृथ्वीचे तापमान प्रिमियम पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ पाकीस्तानी नागरिकांनी मागीतला धुरंधरच्या कमाईमध्ये वाटा दुबईतून भारतात स्वस्त सोने आणण्यास मुदतवाढ महाराणी ताराबाईंबद्दल जैन मुनींचे वादग्रस्त व्यक्तव्य नवीन आर्थिक वर्षात रेडी रेकनर दर स्थिर, अश्विनी भिडे यांनी स्वीकारला आयुक्तपदाचा कार्यभार क्रिकेट कट्टा अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत स्टार क्रिकेट ग्रुप विजयी अष्टपैलू शिक्षक नितिन आहेर जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित !!! नांदूरमध्यमेश्वरमध्ये ‘ग्रेट व्हाईट पेलिकन’चे आगमन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यावर गुन्हा दाखल करा. डिजिटल सूचना फलकांमुळे मुंबईकरांना दिलासा? देशांतर्गत एलपीजी (LPG) उत्पादनात ४०% वाढ बेस्ट’ला बळकटी देण्यासाठी पालिकेचीकटिबद्धताकर्मचाऱ्यांच्या देणीप्रश्नी महापौर संवेदनशील २०११ पर्यंतची निवासी अतिक्रमणे झाली नियमानुकूल पेट्रोल आणि डिझेलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क १० रुपयांनी कमी रामोशी समाजाची होणार राज्यव्यापी परिषद थकीत करभरणा न करणाऱ्या मालमत्तांवर तत्काळ अटकावणी आणि जप्तीची कारवाई करावी – शालेय पाठ्यपुस्तकात अजितदादांच्या जीवन कार्यावर आधारित धडा घेण्याची आमदार राजकुमार बडोले यांची विधानसभेत आग्रही मागणी NCERT ने वगळला मराठा साम्राज्याच्या अटक ते कटक विस्ताराचा नकाशा युद्ध थांबवण्यासाठी ट्रम्पनी इराणसमोर ठेवल्या १५ अटी कोविड काळातील ९८ चित्रपटांना दिलासा; शासनमार्फत ४ कोटी ९० लाखाचा निधी वाटप शर्तभंग’ नियमित करण्याचे अधिकार आता जिल्हाधिकार्‍यांना! पाणी पुरवठ्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्याच्या मागण्यांबाबत आरे प्रशासन चर्चेस तयार साखर कारखान्यांच्या आर्थिक सहाय्यासाठी तातडीने राज्यस्तरीय समिती गठीत नारायण सुर्वे साहित्य संमेलनात गिरणगावचे रंगकर्मी राघवकुमार,कथालेखक काशिनाथ माटल यांना पुरस्कार जाहीर! भायखळा येथील शूटिंगबॉल स्पर्धेत इस्तियाक मालेगावने पटकावला प्रथम क्रमांक हर्षवर्धन सदगीर डबल महाराष्ट्र केसरी 1 एप्रिलपासून पॅनकार्डचे नियम बदलणार एकशे आठ क्रमांकाच्या रुग्णवाहिकांच्या तक्रारींची चौकशी सचिन अहिर सामान्यांच्या प्रश्नावर लढणारे लढाऊ व्यक्तिमत्व! खासदार अरविंद सावंत नगरसेवक सनी निम्हण यांच्या प्रयत्नातून औंध–डेक्कन बससेवा पुन्हा सुरू सोनं-चांदीच्या दरात घसरण सुरूच माजी मंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचं निधन कोकणातील या जिल्ह्यातील सर्व गावे येणार विकिपीडियावर मिरा रोड येथे स्वामी समर्थ प्रकटदिन जल्लोषात पंतप्रधान मोदींनी साधला इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी संवाद हिमालयातील हिमनद्यांचा बर्फ वितळण्याचा वेग झाला दुप्पट PRARAMBH 2026 : नवीन इन्कम टॅक्स कायद्यासाठी देशव्यापी मोहीम बदलापूरहून फक्त अर्ध्या तासात गाठता येणार नवी मुंबई अशोक खरात या भोंदू बाबाची कोट्यवधींची संपत्ती उघड….. वनविभाग मासांहारी प्राण्यांना अधिवासातच देणार पुरेशी शिकार अवकाळी पावसामुळे मराठवाड्यातील 11. 5 हजार हेक्टर क्षेत्रातील पिकाचे नुकसान प्रसिद्ध कार्टून शो डोरेमॉनच्या‌ दिग्दर्शकाचे निधन “स्वामी समर्थ” गाण्याचा संगीत अनावरण सोहळा गिरगाव शोभा यात्रेत संपन्न २० वा ‘पं. जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव’ शुक्रवारपासून अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी उल्हासनगरमध्ये ‘एक खिडकी योजना’ भारतात होणार World Indoor Athletics Championship गुढी पाढवयामुळे ……. आले तरुणाईला उधाण केदारनाथ मंदीर प्रवेशासाठी गैरहिंदूंना द्यावे लागणार सनातनी असल्याचे प्रतिज्ञापत्र महिला खेळाडूंसह नोकरदार महिलांसाठी स्वच्छतागृहे कधी निर्माण करणार, राज्यात वाहनांवरील पर्यावरण कर झाला दुप्पट बिबटे आणि मानव संघर्ष टाळण्यासाठी आता कायद्यात सुधारणा… पोस्टाची प्रीमियम सेवा – २४ तासांत पोहोचणार पार्सल भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह देण्यासाठी कॅनडा सरकारने मागितले 35 लाख मुंबईतील पश्चिम व पूर्व द्रुतगती महामार्ग, मुख्य रस्ते व रहदारीचे रस्‍ते समतल करावेत, उप महापौर श्री. संजय घाडी 10 वी भूगोलाच्या 50 प्रश्नपत्रिकांचा संच चोरीला 10 वी भूगोलाच्या 50 प्रश्नपत्रिकांचा संच चोरीला 2026 चे साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर, या मराठी लेखकाचा सन्मान सेवानिवृत्त एस.टी. कर्मचाऱ्यांना पत्नीसह वर्षभर मोफत प्रवास सिंधू सेवा दलातर्फे शुक्रवारी (ता. २०) ‘चेटीचंड’ महोत्सव सक्तीने धर्मांतर विरोधी विधेयकावर विरोधी पक्षांमध्ये फूट बेकायदेशीर धर्मांतरणाच्या विरोधातील विधेयक सर्व धर्मियांसाठी समान…. Fastag वार्षिक पास १ एप्रिलपासून महागणार ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेला स्थगिती आणि मनाई आदेश देण्याची मागणी आखाती देशातील युद्धामुळे टरबुज उत्पादक शेतकऱ्यांना फटका… राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांना प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर भारतीय चित्रपटांसाठी आता सबटायटल्स आणि ऑडिओ वर्णन अनिवार्य भारतात अडकलेल्या परदेशी नागरिकांना व्हिसा मुदतवाढ LPG गॅसला पर्याय सापडल्याचा पुण्यातील शास्त्रज्ञांचा दावा गॅस पुरवठ्याच्या प्राधान्यक्रमाची नियमावली जारी अनधिकृत पार्किंग केलेल्या वाहनांमुळे पादचारी हैराण पंधरादिवसांत राज्यातील मद्यनिर्मिती बंद करावी लागणार WhatsApp, FB आणि Messenger वर फसवणूक टाळण्यासाठी Meta चे नवे फिचर्स मुंबई मनपाच्या शाळांमध्ये मध्यान्ह भोजनाऐवजी फळे वाटप सक्तीच्या धर्मांतरासाठी ७ वर्षांची कैद, ‘धर्मस्वातंत्र्य विधेयक’ विधानसभेत सादर जागतिक महिला दिन मनाला स्पर्श करणारा उपक्रम ठरला LPG टंचाईमुळे इन्डक्शनच्या मागणीत मोठी वाढ ग्रामीण भागात 45 दिवसांनंतरच बुक होणार LPG सिलेंडर प्रवासी सेवा देणाऱ्या वाहनांना ‘QR कोड’ अनिवार्य देशातील पहिली ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था महाराष्ट्राचीच…. जप्तीची कारवाई सुरू होताच २ हजार ८८८ मालमत्ताधारकांनी भरला कर महाराष्ट्र केसरी २०२५-२६’ कुस्ती स्पर्धेच्या बोधचिन्हाचे झाले अनावरण मुंबईतल्या घरासाठी गिरणी कामगार एकवटला! मुरबे बंदर प्रकल्पाच्या वैधतेवरच प्रश्नचिन्ह बहुचर्चित ‘ लाडकी बहीण ‘ योजनेवर येतोय चित्रपट प्रसिद्ध रॅपर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे मुंबई येथे आगमन ‘हॉवर्थ इंडिया’तर्फे महिला दिनी कर्तृत्त्ववान महिलांसह प्रमुख शहरांमध्ये ‘गिव्ह टू गेन’ मालिकेचे आयोजन माणिकडोह मधील २० बिबट्यांचे वनतारा केंद्रात स्थलांतर अंबरनाथ शिवमंदिर परिसरात 32 घरांवर बुलडोझर हवामान विभागाकडून उष्णतेचा अलर्ट जारी ६० रुपयांनी वाढले घरगुती Gas सिलिंडरचे दर या शहरांत सुरू होणार BSNL 5G सेवा एकल मातांना पूर्ण पालकत्वाचा अधिकार – न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कुंभदूत ॲपचे अनावरण बृहन्‍मुंबई महानगरपालिका स्‍थायी समिती अध्यक्षपदी श्री. प्रभाकर शिंदे यांची बिनविरोध निवड PCM ग्रुप घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही मिळेल मेडिकलला प्रवेश शेअर बाजारात भीषण भूकंप! इराण-अमेरिका युद्धाच्या सावटाखाली बाजार ‘रक्तबंबाळ पंतप्रधानांच्या मेन्यूला अस्सल मराठी तडका ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचे पोस्टर आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनी झाले रिलीज! DGCA कडून विमान प्रवासातील गैरवर्तनाबाबत; ‘झीरो टॉलरन्स पॉलिसी’ लागू अभिनेता प्रसाद ओकच्या कामगिरीचा विश्वविक्रम राज्यसभेच्या ३७ जागांसाठी १६ मार्चला निवडणूक नाशिकमधील द्राक्ष उत्पादक संकटात विमानात एवढं फ्यूएल घेऊन बारामतीच्या दिशेने जाण्याचं कारण काय? जन गण मन आधी ‘वंदे मातरम्’ गाण्याला दल खालसाचा विरोध राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक पद भरतीस मान्यता काळाचौकी येथे खोदकामामुळे अपघातात वाढ हृदय निरोगी ठेवण्यासाठी ‘हार्टस्ट्रॉंग’ पुस्तकातून मार्गदर्शन आणि उपाय मस्क यांची AI कंपनी चंद्रावर उभारणार फॅक्टरी भोईवाडा परिसरात वाहतूक विभागाची धडक संयुक्त कारवाई; नगरसेविका श्रद्धा जाधव सोडवणार क्यू आर कोडने नागरी समस्या महाशिवरात्रीसाठी भीमाशंकर मंदिर राहणार बंद भारत लवकरच या देशात UPI लाँन्च करणार RSS च्या कार्यक्रमाला सलमान खानची उपस्थिती लाडक्या बहिणींच्या e-KYC ला मुदतवाढ १२ जिल्हापरिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी उद्या मतदान देशभर ओला, उबर आणि रॅपिडो चा संप इस्लामाबादमध्ये मशिदीवर आत्मघातकी हल्ला 31 जण मृत्यूमुखी, 169 जखमी भारतातील पहिला AI IPO करी रोड पदपथांवरील हायड्रेलमुळे पादचारी हैराण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना मिळणार Z+ दर्जाची सुरक्षा चेक बाऊन्स प्रकरणी अभिनेता राजपाल यादव विरोधात अटक वॉरंट शक्तिपीठ महामार्गाच्या खर्चात तब्बल १५ हजार कोटींची वाढ अजितदादा पवार यांचे संगमवाडी येथे भव्य स्मारक उभारण्याची मागणी युमनाम खेमचंद सिंह झाले मणिपूरचे 13 वे मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतली पहिल्या महिला उपमुख्यमंत्री पदाची शपथ भायखळा येथे दिवंगत कै.शरद (आप्पा) पवार उद्यानाचे झाले लोकार्पण आज निर्मला सीतारमण नवव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार, मतदार यादीत नाव न सापडल्यास BMC च्या या हेल्पलाईनवर कॉल करा प्रचारतोफा थंडावल्या, उमेदवारांना घरोघरी प्रचारास मुभा राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका 5 फेब्रुवारीला Blinkit, Zepto, Swiggy, Zomato ची 10 मिनिटांची डिलिव्हरी सर्व्हीस बंद नालासोपार्‍यात १० लाखांची रोकड जप्त यामिनी जाधव यांचा मुंबई पालिका निवडणुकीसाठी प्रचाराला वेग राजुलच्या प्रचारासाठी सुप्रिया सुळे भांडुप मध्ये वेदांता समूहाचे अध्यक्ष दान करणार ७५ टक्के संपत्ती नाना आंबोले यांना शिवडीकरांचा वाढता प्रतिसाद ठाकरे बंधूंच्या मुलाखतीचा टीझर प्रसिद्ध क्रांतिज्योती विद्यालय ‘ सुपरहीट, पहिल्याच आठवड्यात ३.९१ कोटी कमाई राज्यभरात प्रचारसभांचा धुरळा, फडणवीस ठाणेकरांशी संवाद ... मुंबईत धावणार 18 डब्ब्यांची लोकल राज्यातील २७ लाख वाहनांना अद्यापही HSRP नाही, लवकरच तपासणी होणार बिनविरोध निवडीला मनसेचा हायकोर्टात आव्हान माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांचं दीर्घ आजारानं निधन वचन ठाकरेंचं! मुंबईकरांसाठी राज-उद्धव ठाकरेंकडून शिवशक्तीचा वचननामा जाहीर आज होणार फैसला! कर्णधार वैभव सूर्यवंशीच्या नेतृत्वात टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका राजुल संजय पाटील यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज संरक्षण क्षेत्रासाठी 79 हजार कोटींच्या खरेदी प्रस्तावाला मंजुरी ३३ वर्षांनंतर पुन्हा उघडणार जेजे हत्याकांडाची केस प्रशिक्षकपदावरून गौतम गंभीरला बीसीसीआयकडून मिळणार डच्चू? अखेर BCCI ने सोडलं मौन, पुण्यात भाजप, राष्ट्रवादीविरोधात लढणार, मविआचा फॉर्म्युला ठरला; 50-50-50 मनसेलाही सोबत घेणार शिवसेनेची लवकरच पहिली यादी; एकनाथ शिंदेंकडून 60 माजी नगरसेवकांना संधी, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी विशेष टोलमाफी पास पर्यूषण पर्वात दोन दिवस कत्तलखाने राहणार बंद २९ टक्के कोसळला या गेमिंग कंपनीचा शेअर Asia Cup मध्ये भारत-पाक आमने सामने- सरकारने दिली परवानगी 12 आणि 28 टक्क्यांचा GST स्लॅब होणार रद्द, सर्वसामान्यांना फायदा अमेरिकेत छत्रपती शिवरायांच्या कीर्तीरथाची भव्यदिव्य मिरवणूक कानात ईअर फोन असल्याने युवकाचा मृत्यू पोस्ट झाले अत्याधुनिक – अ‍ॅडव्हान्स पोस्टल टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म सुरु BSNL ची मान्सून ऑफर – 1 महिना मोफत इंटरनेट गणेश विसर्जनाच्या पार्श्वभुमीवर सामाजिक सलोख्यासाठी हजरत महंमद पैगंबर जयंती ८ सप्टेंबर रोजी होणार .. आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर निवृत्त न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी विरोधी पक्षाचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार प्रवासाला तब्बल बारा तास, मग टोल का द्यावा, सर्वोच्च न्यायालयाचा सवाल उपमुख्यमंत्री शिंदेंनी जाहीर केले ‘लाडकी सून’ अभियान मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टी… कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ… उच्च न्यायालयाचे कोल्हापूर सर्किट बेंच झाले सुरू मतदार यादीबाबतचे आरोप शपथपत्रासह करा अन्यथा माफी मागा… शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेचा निकाल १८ ऑगस्टला जालन्यात मुसळधार पावसाने नदी नाले तुडुंब… मुंबईत पागडीधारकांना आदित्य ठाकरेंकडून पुनर्वसनाची हमी कॅडबरी डेअरी मिल्कच्या रॅपरवर खास मराठीत शब्द पहिल्याच दिवशी FASTag वार्षिक पासला भरभरुन प्रतिसाद, १.४ लाखांहून अधिक नोंदणी राज्यात १६ ते २१ ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टीचा इशारा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्राचे उद्घाटन लवकरच ‘मुंबई विदिन ५९ मिनिट्स’ स्वप्न पूर्ण होणार डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौ.फुटांचे घर बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत सर्व घटकांना सोबत घेऊन विकास करणार ! नारळी पौर्णिमेला वरळीत हुल्लडबाजी करणाऱ्या उबाठा गटावर कारवाई करा BSF मध्ये 1121 जागांसाठी भरती; 10वी-12वी व ITI करु शकतात अर्ज 15 ऑगस्टपासून सुरू होणार FASTag Pass गणेशोत्सव काळात मुंबईत ‘डीजे’ला बंदी दादरमध्ये इमारतीच्या छतावर कबुतरखाना सुरू आधार कार्ड, व्होटर कार्ड,रेशन कार्ड हे नागरिकत्त्वाचे पुरावे नाहीत 15 ऑगस्ट रोजी कल्याण-डोंबिवलीत मांसाहार बंदी इथेनॉल पुरवठ्यात उ.प्रदेश पहिल्या तर महाराष्ट्र दुसर्‍या स्थानी हेपेटायटीस D पासून कर्करोगाचा धोका असल्याचा WHO चा निर्वाळा दहिहंडी सराव करताना 11 वर्षीय बालकाने गमावला जीव अमेरिकेच्या टॅरिफमुळे दोन अब्ज डॉलरची कोळंबी निर्यात धोक्यात सिंचन तलाव धोक्यात; भिंत खचली, २०० एकर शेतीला धोका…. हुतात्मा स्मारकाच ऐतिहासिक महत्त्व टिकले पाहिजे - आमदार सचिन अहिर रेल्वेकडून इतर प्रवाशांसह मुंबईकरांसाठी सुरक्षेच्या नव्या उपाययोजना राजकीय पक्षाचा चेहरा राहिलेली व्यक्ति न्यायालयाचा चेहरा असणे योग्य आहे का ? सरकारने लोकसभेत सादर केलेले आयकर विधेयक घेतले मागे अमेरिकेच्या टॅरिफचा भारतीय वस्त्रोद्योगाला मोठा फटका ठाणे जिल्ह्यातील या शहरात लवकरच सुरु होणार ‘पॉड टॅक्सी’ सेवा माथेरानची हातरिक्षा बंद करा – सर्वोच्च न्यायालयाचा आदेश कबुतरांना अन्न-पाणी देण्यावर उच्च न्यायालयाची बंदी कायम एक पडदा सिनेमागृहाबाबत संयुक्त समिती कोल्हापूरकर जिंकले, महादेवी हत्तीण पुन्हा येणार नांदणी मठात उत्तराखंडला गेलेले महाराष्ट्रातील सर्व पर्यटक सुखरूप ज्योतिर्लिंग विकास आराखड्यांच्या अंमलबजावणीसाठी सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती उत्तरकाशीमध्ये ढगफुटीमुळे हाहाकार, ४ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता भाजपाचे पदाधिकारी बनले न्यायाधीश, न्यायपालिकेचा निष्पक्षपणा धोक्यात? सेंचुरी मिलचा भूखंड कोणाच्या घशात घालणार? कामगार नेते गोविंदराव मोहिते‌ भायखळ्यात आमदार चषक 2025 ही भव्य हॉलीबॉल स्पर्धा संपन्न शिवसेना प्रभाग 205 च्या वतीने लाडू वाटप नृत्येश्वर संस्थेच्या विद्यार्थ्यांनी तैवानमध्ये भारतीय लोकनृत्यांची केली बहारदार सादरीकरण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो स्थानकाच्या नामकरणाविरोधात शिवसेनेचे आंदोलन एसटी आता करणार रिटेल (किरकोळ ) इंधन विक्री कबुतरांना खाद्य देणार्‍याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचा न्यायालयाचा आदेश काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा भाजपामध्ये प्रवेश ‘$1 ट्रिलियन’ अर्थव्यवस्थेकडे महाराष्ट्राची वेगवान वाटचाल! निवडणूक पारदर्शक होण्यासाठी मतदार यादी आधार क्रमांकाशी जोडा राज्यातील महापालिका रुग्णालयांमध्ये महिलांसाठी कर्करोग तपासणीची मोहीम हाती… स्वामीनाथन यांचा जन्मदिन “शाश्वत शेती दिन” म्हणून साजरा राज्य सरकारने जाहीर केले नवे सोशल मीडिया नियम राज ठाकरे आल्यानं कित्येक पटीनं आनंद- उद्धव ठाकरे खडसेंचा जावई पुण्यात रेव्ह पार्टीत रंगेहाथ पकडला गेला लाडकी बहीण योजनेसाठी 26.34 लाख महिला अपात्र जन्मतःच या बालकाच्या नावावर गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड 10 उत्तीर्ण उमेदवारांसाठी IB मध्ये नोकरीची मोठी संधी शाळा, कॉलेज आणि कोचिंग संस्थांसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून 15 निर्देश जारी मुंबई रेल्वे साखळी स्फोट प्रकरण : हायकोर्टाच्या निकालाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती भारत आणि ब्रिटन यांच्यातील मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी ससून डॉकमधील मच्छीमारांच्या पुनर्वसनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल मुंबई के समुंदर में दुबे दुबे कर मारेंगे.. ; राज ठाकरे निशिकांत दुबेवर कडाडले सीमाभागातील निपाणी शहरात कन्नड भाषेची सक्ती महायुती सरकारला सत्तेचा माज -माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई महाराष्ट्राचीच , मुंबईत मराठी माणसाचाच आवाज बुलंद …. ‘जय गुजरात’ म्हणणारे एकनाथ शिंदे गुजरात व अमित शाहांचे गुलाम म्हाडा लॉटरीचा धडाका; ठाण्यात 2000 घरांसाठी सोडत, वाचा कधी येणार जाहिरात पावसाळ्यात केस का गळतात? अशी घरगुती उपाय करून थांबवा केस गळती NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

राजद्रोह कि देशद्रोह...

सध्या सर्वोच्च न्यायालयाने देशद्रोह संबंधी विद्यमान सरकारने भारतीय नागरिकांविरोधात टाकलेल्या याचिकांवर सुनावणी करताना स्वातंत्र्यप्राप्ती पूर्वीपासून सुरु असलेल्या भारतीय दंड संहितेमधील कलम 124-ब बद्दल उहापोह केला आहे. या कलमाची आवश्यकता आहे का ? असा सवाल सरकारला विचारून येत्या दोन आठवड्यात सरकारला शपथपत्र दाखल करायला सांगितल्याने पुन्हा एकदा वरील कलम चर्चेत आले असून राजद्रोह हाच देशद्रोह मानायचा का ? अशी चर्चा बुद्धिवंतांमध्ये होताना दिसत आहे. सरतेशेवटी या कलमाच्या अस्तित्वबाबत आता सर्वोच्च न्यायालयच निर्णय घेणार असल्याने या कलमाचा भारतीय दंड संहितेमधून अपव्यय होण्याची दाट शक्यता वाटते. भारतीय दंड संहिता कलम 124ब नुसार नागरिकांची विद्यमान सरकार विरोधातील कोणतीही कृती, विचार, लेखन हे एखाद्याला देशद्रोही ठरवण्यास पुरेसे असून त्याचे प्रत्यंतर सध्या भारतीय घेत आहेत. मोदी सरकारविरोधात लिखाण करून असंतोष पसरवला म्हणून काही प्रज्ञावंतांना, पत्रकारांना तर व्यंगचित्राच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन केले म्हणून व्यगंचित्रकारांवर देशद्रोहाखाली खटले दाखल केले आहेत. त्यामुळे या कायद्याचा वापर नकारात्मकच होत असल्याने त्याच्या आवश्यकतेबद्दल फेरविचार करण्याची वेळ सर्वोच्य न्यायालयावर आली आहे.

भारतावर सुरळीतपणे राज्य करता यावे म्हणून इंग्रजांनी भारतीय दंड संहिता 1860 देशात लागू केली. त्यामध्ये कलम 124ब या देशद्रोही कलमाचा अंतर्भाव करून त्याकाळी अनेक स्वातंत्र्यवीरांना, त्याकाळच्या नेत्यांना तुरुंगात डांबले. याच कायद्याचा वापर करून लोकमान्य टिळकांना सहा वर्षाची शिक्षा ठोठावली तर गांधीजीनाही  तुरुंगात टाकण्यात आले. ज्यावेळी गांधीजींना तुरुंगात डांबले त्यावेळच्या न्यायाधीशाने जर सरकारने तुम्हाला सोडले तर मला आनंद होईल असे म्हणून हा कायदा राजकीय वापरासाठीच आहे हे दाखवून दिले. त्यामुळे या कायद्याच्या आवश्यकतेबाबत संसदेत चर्चा होणे गरजेचे होते. देशाच्या पहिल्या पंतप्रधानांनीही देशद्रोह्यासारख्या कायद्याची आवश्यकता नसल्याचे वारंवार बोलून दाखवले पण त्याचे निर्मूलन करण्याचे प्रयत्न त्यांनी किंवा त्यानंतर आलेल्या कोणत्याही सरकारने केले नाहीत. याउलट  देशहितासाठी यापेक्षाही गंभीर टाडा, उपा सारखे कायदे दहशतवादाला आळा घालण्यासाठी बनवल्याचे जरी बोलले जात असले तरी त्याचा वापर देशद्रोह्यांविरोधी कमी आणि राजद्रोह्यांविरोधी अधिक वापरला जात असल्याचे पाहायला मिळत आहे.

खरंतर देशद्रोहासाठी कडक कायद्यांची आणि त्याच्या अंमलबजावणीची खरोखरच आवश्यकता आहे. ज्यावेळी देशात खलिस्तानवादी चळवळ डोक वर काढत होती त्यावेळी टाडा सारख्या कायद्याची निर्मिती तत्कालीन सरकारने केली. पण ज्यावेळी या कायद्याचा दुरुपयोग सर्वसामान्य नागरिकांना अतिरेकी ठरवण्यासाठी होऊ लागला त्यावेळी या कायद्याचे निर्मूलन त्यानंतर आलेल्या सरकारने केले. पुन्हा देशाच्या उत्तर-पूर्व भागात नागालँड, आसाम येथे फुटीरतावाद्यांनी डोके वर काढले त्यावेळी पुन्हा सरकारने ‘उपा’ या कायद्याची निर्मिती केली. एकदा का ‘उपा’ कायदा एखाद्या व्यक्तीला लावला कि त्याला पहिले सहा महिने तुरुंगातच खितपत पडावे लागते. नंतर संबंधित व्यक्ती सरकारच्या समितीकडे हा कायदा हटवावा म्हणून अर्ज करू शकतो आणि तो मंजूर झाला नाही तर संबंधित व्यक्ती उच्च न्यायालयात त्याच्या वैधतेबाबत आवाहन देऊ शकतो. पण न्यायालयात जरी आवाहन दिले तरी जोपर्यंत सरकार त्याबाबत अहवाल सादर करत नाही तोपर्यंत संबंधित व्यक्ती सहज दोन ते तीन वर्ष कारागृहात टाकण्याची सोय या कायद्याने सरकारला दिली आहे. त्यामुळे आपल्या विरोधकांचा आवाज दाबण्याचं एक मजबूत अवजार सरकारच्या हातात असल्याने कोणालाही हे अवजार बोथट करायचे नाही.

मोदी सत्तेवर आल्यानंतर या कायद्याचा वापर अतिशय वाढला असून हजारो लोकांना या कायद्याच्या माध्यमातून कारागृहात ढकलले आहे. 2014 पासून सुमारे 816 देशद्रोहाच्या केसेस दाखल करण्यात आल्या असून त्यामध्ये 11000 लोकांचा समावेश आहे. यामध्ये 405 खटले हे विद्यमान राजकर्ते व सरकारविरोधी भाष्य केले म्हणून दाखल झाले असून 149 खटले हे पंतप्रधान मोदींविरोधी अवमानास्पद आणि अपशब्दबद्दल असून 144 खटले हे योगी आदित्यनाथांच्या बदनामी बद्दल आहेत. सीएए कायद्याच्या विरोधात आंदोलन करणार्‍यांविरोधात तसेच पुलवामा हल्ल्याच्या विरोधात वक्तव्य करणार्‍यांविरोधात बहुतेक भाजप राज्यात देशद्रोहाचे खटले दाखल झाले असून त्यामध्ये 3742 लोकांविरोधी या धारा लावण्यात आल्या आहेत. या पूर्वी हा कायदा माओवादी विरुद्ध, दहशदवादी कृत्य करणार्‍यांविरोधात तर देशाचे खोटे चलन छापणार्‍यांविरोधात वापरला जात असे. पण 2014 नंतर मात्र या कायद्याचा वापर सरसकट सरकार विरोधी आवाज दडपण्यासाठी होऊ लागल्याने या कायद्याच्या आवश्यकतेविषयी प्रश्नचिन्ह सर्वोच्च न्यायालयापुढे उभे ठाकले आहे.

भारताने राजशकट हाकण्यासाठी लोकशाही पद्धत स्वीकारली. लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही. पण सध्या दोघांनी दोघांसाठी चालवलेले दोघांचेच राज्य अशी नवीन  लोकशाहीची परिभाषा या देशात उदयास आली आहे. घटनेनेही नागरिकांना अनेक हक्क आणि जबाबदार्‍यांबरोबर विचार आणि व्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. सरकारची धोरणे जर नागरिकांना आवडत नसतील त्याविरुद्ध व्यक्त होणे, आंदोलनाच्या माध्यमातून जनजागृती करणे, कायदे करण्यास किंवा कायदे बदलण्यास सरकारला भाग पडणे हे नागरिकांना घटनेने दिलेले संरक्षण आहे. पण सरकारच्या कायद्यांविरोधात जर कोणी आंदोलन करत असतील तर त्याला देशद्रोही ठरवून गजाआड टाकण्याची नवीन प्रथा या सरकारच्या काळात सुरु झाली आहे. ज्या इंग्रजांनी सरकार टिकवण्यासाठी या कायद्यांचा वापर केला त्याच कायद्यांचा वापर विद्यमान सरकार जनतेची मुस्कटदाबी करण्यासाठी वापरत असल्याने शेवटी नागरिकांनाच या कायद्यातील तरतुदींनाच सर्वोच्च न्यायालयात आवाहन द्यावे लागले आहे. मोदी सरकारने देशद्रोहाखाली टाकलेल्या अनेकांना कोणताही पुरावा नसल्याने न्यायालयाने जामिनावर सोडले तर नुकतेच सामाजिक कार्यकर्ते स्टेन स्वामी यांच्या कारागृहातील मृत्यूने आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची दाखल घेतली गेल्याने इतके दिवस डोळे बांधून हातात तराजू घेऊन उभ्या असलेल्या न्यायदेवतेला त्याची दखल घ्यावी लागली. सर्वोच्य न्यायालयाने 1995 साली रद्द केलेल्या माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत अनेक खटले मोदी सरकारने समाज माध्यमांवर सरकारविरोधात मत व्यक्त केल्याचे उघडकीस आले हे तर फारच धक्कादायक आहे. शेवटी सर्वोच्च न्यायालयाला हे सर्व खटले रद्द करण्याचे आदेश सरकारला द्यावे लागले हि केव्हढी मोठी नामुष्की या सरकारची आहे. पण ‘निर्लज्जम सदा सुखी’ म्हणतात तसेच या सरकारचा कारभार सुरु आहे.

राजद्रोह आणि राष्ट्रद्रोह याची परिभाषा निश्चित करण्याची जबाबदारी आता सर्वोच्य न्यायालयावर येऊन पडली आहे. खरंतर कायदे बनवणे हे संसदेचं काम आहे पण जेव्हा कायदे मंडळच सदविवेक बुद्धी हरवते तेव्हा ते काम कायद्याचा अर्थ सांगणार्‍या सर्वोच्च न्यायालयाला करावे लागते. यावेळी हे काम न्यायालयाला रामशास्त्री प्रभुणे यांच्या भूमिकेतून कठोरपणे करावे लागणार आहे. एखाद्या सरकारविरोधात किंवा त्यांच्या धोरणा विरोधात आवाज उठवणे हा राजद्रोह असू शकतो पण तो देशद्रोह नाही हे मोदींना सांगण्याची वेळ आता आली आहे. सोनारानेच कान टोचणे बरे असे म्हटले जाते, त्यामुळे हे कार्य सर्वोच्च न्यायालयाने लवकरात लवकर करणे आवश्यक आहे. येत्या काळात पाच राज्यात निवडणुका होणार असून त्यात उत्तरप्रदेश सारख्या महत्वाच्या राज्याची निवडणूक आहे. या निवडणुकीवरच केंद्र सरकारचे भविष्य ठरणार आहे. मोदी आणि योगी दोघांची प्रतिमा कोरोना संक्रमणातील अपयशाने झाकोळलेली आहे. त्याची झलक उत्तरप्रदेश पंचायत निवडणुकीत देशाला पाहायला आली असून हे टाळायचे असेल तर राजद्रोह आणि राष्ट्रद्रोह याची परिभाषा लवकरात लवकर निश्चित करणे गरजेचे आहे. नाहीतर राजद्रोहालाच राष्ट्रद्रोह ठरवून अनेकांना गजाआड केले जाईल. राष्ट्रद्रोहाच्या ढालीआड निवडणुकीतील राजकीय प्रतिस्पर्धी दूर करून निवडणुका जिंकल्या जातील आणि हजारोंच्या बलिदानाने मिळवलेले हे स्वातंत्र कुचकामी ठरेल. म्हणून राजद्रोह हा देशद्रोह नाही सांगण्याची हीच ती वेळ आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Swarajya
    Adarsh Swarajya

    The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News

    Adarsh Swarajya

संबंधित पोस्ट