विनाकारण फिरणारे 295 जण कोरोना पॉझिटिव्ह
पनवेल : कोरोनाला अटकाव घालण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अत्यावश्यक कामाशिवाय कोणालाही बाहेर फिरण्यास मनाई आहे. तरीही रस्त्यावर विनाकारण फिरणार्यांची संख्या कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीये. त्यामुळे विनाकारण रस्त्यावर फिरणार्यांची रॅपिड अँटीजन व आरटीपीसीआर तपासणी सुरू केली आहे. यामध्ये तब्बल 295 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या सुपर स्प्रेडर ठरणार्यांना पोलिसांनी इंडिया बुल्स या कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे.
दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने 1 जूनपर्यंत संचारबंदी लॉकडाउन लागू केलेला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सुविधा बंद ठेवण्याचे आदेश आहेत. त्याचबरोबर संचारबंदी काळात विनाकारण घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे, तरीही अनेक नागरिकांची शहरात भटकंती सुरूच आहे. त्यामुळे विनाकारण फिरणार्यांना अडवून त्यांची रॅपिड अँटीजेन व आरटी-पीसीआर चाचणी करण्याचा उपाय पनवेल महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या आदेशानुसार आरोग्य विभाग पथक तसेच पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन भोसले-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर, पनवेल तालुका, खांदेश्वर, कामोठे, कळंबोली, तळोजा, आणि उरण पोलीस ठाणे अतंर्गत ठिकठिकाणी पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली आहे. या नाकाबंदीमध्ये दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच रस्त्यावर रिकामटेकडे भटकणार्यांची थेट रस्त्यावरच अँटीजेन व आरटीपीसीआर तपासणी करण्याची मोहीम सुरू केली आहे. शिवाय पनवेल महानगरपालिका, आरोग्य विभाग यांची टीमही या कामी पोलिसांची मदत करीत आहे. रस्त्यावर मोकाट फिरणारे, भाजी विक्रेते, फळ विक्रेते यांची अँटीजेन व आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली. यामध्ये 295 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. ज्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, त्यांना इंडिया बुल्स कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Adarsh Swarajya