नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरातवर 11 गुन्हे दाखल
नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरातवर 11 गुन्हे दाखल
नाशिक - नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरातवर 11 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. यात महिलांचे लैंगिक शोषण, भोंदू गिरी, जादुटोणा, फसवेगिरी यासह वेगवेगळ्या गुन्ह्यांचा समावेश आहे. या घटनेतील पीडीत महिलांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यामुळे काही महिलांची बदनामी समोर आले आहे, अशातच आता या प्रकरणाचा तपास करणाऱ्या SIT च्या प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी आज पत्रकार परिषद घेत महत्त्वाची माहिती दिली आहे.
तेजस्वी सातपुते यांनी सांगितले की, चौकशीतून आरोपी खरात पीडीत व्यक्तीच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत होता. धमकी देत होता. भीती दाखवत होता. खडे, चिंचोके इत्यादी गोष्टीद्वारे पैसा उकळत होता. महिलांना दैवी शक्ती असल्याचं सांगत होता. कुटुंबीयांच्या मृत्यूची भीती दाखवून, त्यांना बदनामीची धमकी देऊन लैंगिक शोषण करत होता. ईशान्यश्वर मंदिराच्या परिसरात अंधारात दैवी शक्ती असल्याचं भासवून अंधश्रद्धा पसरवत होता.’
तेजस्वी सातपुते यांनी पुढे म्हटले की, ‘पीडितांच्या व्हिडीओच्या एकूण 4650 लिंक्स सायबर टीमने डिलिट केल्या आहेत. 4 जणांची टीम व्हिडिओवर लक्ष ठेऊन आहेत. हे लोक पूर्णवेळ तेच काम करत आहेत. काही मिनिटांमध्ये नवीन काही अपलोड झालं का ते शोधणं आणि त्याला रिपोर्ट करण्याचं काम सुरू आहे. सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट वारंवार टाकणाऱ्या ग्रुपला बंद केलं आहे. व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांवर दोन जणांना अटक केली आहे. अहिल्यानगर पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.’
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर