अनंत अंबानीच्या रक्तदान शिबिरात अनंत गर्दी, नियमांची पायमल्ली
अनंत अंबानीच्या रक्तदान शिबिरात अनंत गर्दी, नियमांची पायमल्ली
परिषद कारवाई करणार का?
मुंबई-रक्तदान हे स्वैच्छिक असल्याने रक्तदान शिबिरांमध्ये कोणत्याही प्रकारच्या भेटवस्तू देणे हे राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार बेकायदेशीर आहे, असे असताना अनंत अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त नाना चौक येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात प्रत्येक रक्तदात्याला नामांकित कंपनीचे जवळपास 4 ते 5 हजार रुपये किमतीचे घड्याळ भेट म्हणून देण्यात आले.हे रक्तदान शिबिर सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत असतानाही या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करून घड्याळाची भेट मिळवण्यासाठी सकाळी 7 वाजल्यापासूनच नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. त्यामुळे सभागृहामध्ये रक्तदानासाठी लावलेले बेड आणि सोयी सुविधा अपुऱ्या पडल्या.
या शिबिरात नामांकित कंपनीचे जवळपास 4 ते 5 हजार रुपयांचे घड्याळ मिळणार असल्याने अवघ्या दोन तासांत या शिबिरामध्ये ४०० नागरिकांनी रक्तदान केले. दुपारी ४ वाजेपर्यंत १५०० नागरिकांनी रक्तदान केले होते. तर सभागृहाबाहेरही मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या होत्या. तसेच या परिसरात पार्किंगसाठी जागा नसताना देखील मोठ्या प्रमाणात अनअधिकृत पार्किंग केल्यामुळे स्थानिक रहिवाशांना या सर्व गोष्टींचा नाहक त्रास सहन करावा लागला. या गर्दीमुळे रक्तदान शिबिराची वेळही वाढविण्यात आली. राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषद व राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या परिपत्रकानुसार रक्तदान शिबिरामध्ये रक्तदात्यांना आयोजकांकडून कोणत्याही प्रकारची भेटवस्तू देण्यात येऊ नये. स्वैच्छिक रक्तदान शिबिरामध्ये आयोजकांकडून रक्तदात्यांना भेटवस्तू दिल्यास संबंधित रक्तपेढीवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते.
मात्र असे असतानाही या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी झालेल्या जे.जे. महानगर रक्तपेढी, नायर रुग्णालय रक्तपेढ जे.जे. रुग्णालय रक्तपेढी या शासकीय रक्तपेढ्यांकडूनच नियम पायदळी तुडवण्यात आले आहेत. त्यामुळे या सरकारी रक्तपेढ्यांवर राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून कारवाई होणार का असा प्रश्न आता सर्व स्तरातून उपस्थित केला जात आहे.
राज्य रक्त संक्रमण परिषदेचे संचालक डॉ. सुहास मोहनाळकर यांच्याकडे यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी मला याबाबत कल्पना नव्हती. त्यामुळे मी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन याची तपासणी केल्यानंतरच निर्णय घेईन, असे सांगितले.
रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यापूर्वी रक्तपेढ्यांना आयोजकांकडून रक्तदान हे स्वैच्छिक, विना मोबदला आणि रक्तदात्याच्या स्व-इच्छेनुसार आहे व कुठलाही मोबदला रोख स्वरूपात किंवा वस्तूच्या स्वरुपात दिला जाणार नाही. तसेच परिषदेच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे प्रतिकात्मक भेटीशिवाय इतर कोणतीही भेटवस्तू दिली जाणार नाही. या मार्गदर्शक तत्त्वांच्या सर्व नियम आणि अटी व शर्तीचे पालन करू असा मजकूर असलेले हमीपत्र रक्तपेढ्यांना आयोजकांकडून भरून घेणे आवश्यक असते. या सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता केली होती की नाही हे पाहणे आता तितकेच गरजेचे ठरत आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant