समग्र शिक्षण संघर्ष समितीच्या मागण्या मान्य करण्यासाठी पूर्णपणे पाठपुरावा करू
समग्र शिक्षण संघर्ष समितीच्या मागण्या मान्य करण्यासाठी पूर्णपणे पाठपुरावा करू
अरुण मोरे सरचिटणीस स्थानीय लोकाधिकार सेना महासंघ
मुंबई-समग्र शिक्षण संघर्ष समितीने त्यांच्या विविध मागण्यांसाठी आझाद मैदानात गेल्या 33 दिवसापासून आंदोलन सुरू केले आहे. शिवसेना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि महासंघाचे अध्यक्ष माजी खासदार गजानन कीर्तिकर आपल्या पाठीशी खंबीरपणे राहून आपल्याला न्याय देण्यासाठी त्यांच्या माध्यमातून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करू असे जाहीर प्रतिपादन स्थानीय लोकाधिकार सेना महासंघाचे सरचिटणीस अरुण मोरे यांनी आझाद मैदान येथे समग्र शिक्षण संघर्ष समितीच्या आंदोलनाला भेट देऊन केले. ते पुढे म्हणाले आता तुमची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे. राज्यातील कंत्राटी पद्धती मुळे अनेक कामगारांचा छळ होत आहे. कंत्राटी पद्धतीमुळे कामगारांचे वय 50, 52, 56 अगदी निवृत्तीचे वय आले तरी पण त्यांना कोणताही लाभ आणि बेनिफिट्स मिळत नाही. त्यामुळे त्यांच्यासमोर वयोवृद्ध वयात आपला उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. असाच प्रश्न माझगाव डॉक येथे कामगारांमध्ये देखील निर्माण झाला आहे. गेले 20, 20 आणि 25 वर्षे कंत्राटी पद्धतीमध्ये कामगार काम करत आहेत. इतके वर्षे काम करून देखील ते अजून परमानंट झालेले नाहीत. तोही प्रश्न आम्ही लवकरच हाती घेतला असून तोही लवकर सोडवण्यात येईल.
हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी स्थानीय लोकाधिकार सेनेची स्थापना करून महाराष्ट्रातील मराठी माणसाला केंद्र सरकार, राज्य शासन तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भूमिपुत्रांना नोकरी कशा मिळतील यासाठी फार मोठा लढा उभारला होता. त्यांनी यासाठी कधी राजकारण केलं नाही. परंतु भूमिपुत्रांना त्यांचा न्याय मिळवून दिला. आपल्याला देखील या ठिकाणी आंदोलन करून 33 दिवस झाले आहे. 33 दिवस आंदोलन करणे म्हणजे फार मोठ्या सातत्य असते ते आपण टिकवून ठेवले आहे. आज मी आपल्याला या ठिकाणाहून अशी ग्वाही देतो की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यापर्यंत आपल्या मागण्या पोचल्या असून येणारे काही दिवसातच आपल्या सगळ्या मान्य मान्य होतील असा मला ठाम विश्वास असल्याची माहिती शिवप्रसाद भामरे यांनी या ठिकाणी दिली. यावेळी समग्र शिक्षण संघर्ष समितीच्या वतीने स्थानीय लोकाधिकार सेना महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आपल्या विविध मागण्यांच्या निवेदन देण्यात आले.
यावेळी शिवसेना स्थानीय लोकाधिकार सेना महासंघाचे अनेक पदाधिकारी, समग्र शिक्षण संघर्ष समितीचे पदाधिकारी कामगार आणि शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant