पुण्यात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
पुण्यात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
पुणे - रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट, पुणे यांच्या पुढाकाराने आणि अखिल बाजीराव रोड रामनवमी उत्सव समिती ट्रस्ट, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी, दि. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी १० ते सायं. ६ या वेळेत नुमवी शाळेसमोर, बाजीराव रोड, लोखंडे तालीम चौक, पुणे येथे होणार आहे.
मंत्री, उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य महाराष्ट्र राज्य तथा कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार नामदार चंद्रकांतदादा पाटील आणि समर्थ युवा फाउंडेशन यांच्या माध्यमातून हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
या आरोग्य शिबिरामध्ये सर्वसाधारण आरोग्य तपासणी व उपचार, रक्तातील साखर (BSL-R), रक्तगट, रक्तदाब, कोलेस्टेरॉल तसेच रक्तातील घटकांची (HB, RBC, WBC, PLT) तपासणी केली जाणार आहे. दंत तपासणी, कीड काढणे व सिमेंट भरणे, स्केलिंग व पॉलिशिंग या सेवा उपलब्ध असतील. तसेच ४० वर्षांवरील नागरिकांसाठी मोतीबिंदू व काचबिंदू तपासणी, महिलांसाठी ४० ते ६० वयोगटातील स्तन कर्करोग तपासणी (मॅमोग्राफी) सुविधा देण्यात येणार आहे. महिलां व पुरुषांसाठी जवळच्या दृष्टीसाठी मोफत चष्म्यांचे वाटपही करण्यात येईल.
सुमारे १३,५०० रुपयांच्या आरोग्य तपासण्या पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 2 APR TO...
- 02 April, 2026
ADHARSH SWARAJ 26 MAR TO...
- 26 March, 2026
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade