एमएसएमई क्षेत्राच्या बळकटीसाठी संसदीय स्तरावर महत्त्वपूर्ण चर्चा;
एमएसएमई क्षेत्राच्या बळकटीसाठी संसदीय स्तरावर महत्त्वपूर्ण चर्चा; ‘फ्रेंड्स ऑफ एमएसएमई’ बैठकीत धोरणात्मक मुद्द्यांवर विचारमंथन
नवी दिल्ली – कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया येथे आयोजित फ्रेन्डस् ऑफ एमएसएमई इन पार्लियामेंट (Friends of MSME in Parliament) या महत्त्वपूर्ण बैठकीत देशातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक धोरणात्मक उपाययोजनांवर सखोल चर्चा करण्यात आली.
काल सायंकाळी झालेल्या या बैठकीत उद्योग क्षेत्रासमोरील विविध अडचणी, आर्थिक व प्रशासकीय अडथळे, तसेच वाढीच्या नव्या संधी यांचा आढावा घेण्यात आला. विशेषतः एमएसएमई क्षेत्राला वित्तपुरवठा, तंत्रज्ञानाचा वापर, बाजारपेठेतील स्पर्धा आणि निर्यातवाढ यांसंदर्भातील मुद्द्यांवर व्यापक विचारमंथन झाले. एमएसएमई क्षेत्र हे देशाच्या अर्थव्यवस्थेचे कणा मानले जाते. रोजगारनिर्मिती, स्थानिक उद्योगांना चालना आणि ग्रामीण-शहरी आर्थिक संतुलन राखण्यात या क्षेत्राची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. त्यामुळे या क्षेत्राच्या बळकटीसाठी केंद्र आणि राज्य स्तरावर सुसंगत धोरणे राबविण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली.
बैठकीत सहभागी होताना उपस्थित मान्यवरांनी उद्योग क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने संवाद, समन्वय आणि सहकार्य आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. अशा प्रकारच्या संसदीय मंचांमुळे धोरणनिर्मिती प्रक्रियेला अधिक बळकटी मिळून उद्योग क्षेत्राला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. या बैठकीच्या माध्यमातून एमएसएमई क्षेत्राच्या प्रगतीसाठी ठोस पावले उचलण्याच्या दृष्टीने सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, उद्योगविकासासाठी आपली बांधिलकी अधिक दृढ झाल्याची भावना खासदार संजय दिना पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर