भारताने इराणला पाठवली वैद्यकीय मदत
भारताने इराणला पाठवली वैद्यकीय मदत
नवी दिल्ली - अमेरिका आणि इस्राइलने इराण विरुद्ध पुकारलेल्या भीषण युद्धामध्ये अद्याप तटस्थ भूमिका घेणाऱ्या भारत सरकारने आता इराणला वैद्यकीय मदत पाठवली आहे. भारताकडून वैद्यकीय मदतीचा पहिला टप्पा आज इराणला पोहोचला. यात औषधे व आवश्यक वैद्यकीय साहित्य पाठवण्यात आले. ही मदत इराणी रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली. इराणच्या दूतावासाने सोशल मीडियावर संदेश देत म्हटले: “भारतीय जनतेचे आम्ही मनःपूर्वक आभार मानतो. ही मदत आमच्यासाठी कठीण काळात मोठा आधार आहे.” तेहरानने भारताच्या या कृतीचे स्वागत करत भारतीय जनतेला ‘दयाळू लोक’ असे संबोधले.
दरम्यान अमेरिका आणि इस्रायल यांनी आता इराणच्या ऊर्जा सुविधांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमांनुसार, अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या दक्षिणेकडील ‘साउथ पार्स’ (South Pars) वायू क्षेत्र आणि ‘असालुयेह’ (Assaluyeh) शहरातील तेल व वायू सुविधांवर हवाई हल्ले केले आहेत.
‘साउथ पार्स’ हे जगातील सर्वात मोठे नैसर्गिक वायू क्षेत्र मानले जाते. प्राप्त माहितीनुसार, या हल्ल्यात केवळ वायू क्षेत्राशी संबंधित पायाभूत सुविधांनाच नव्हे, तर पेट्रोकेमिकल आणि तेल सुविधांनाही लक्ष्य करण्यात आले. इस्रायली प्रसारमाध्यमांनी ‘बुशेहर’ (Bushehr) भागातील एका वायू सुविधेवरही हल्ला झाल्याचे वृत्त दिले आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade