‘जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धा सन २०२६’चा निकाल जाहीर
माननीय महापौर आयोजित ‘माझी मुंबई’या संकल्पनेवर आधारित ‘जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धा सन २०२६’चा निकाल जाहीर
मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने रविवार दिनांक १ मार्च २०२६ रोजी बृहन्मुंबई क्षेत्रातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी माननीय महापौर आयोजित ‘माझी मुंबई’ या संकल्पनेवर आधारित ‘जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धा’ आयोजित करण्यात आली होती. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध ५१ ठिकाणी आयोजित या स्पर्धेमध्ये ८६ हजार ३५६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचा निकाल मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी आज (दिनांक २४ मार्च २०२६) घोषित केला.
महानगरपालिका मुख्यालयात पत्रकार कक्षात आयोजित पत्रकार परिषदेतून महापौर श्रीमती रितू तावडे यांनी सविस्तर निकालाची घोषणा केली. याप्रसंगी उप महापौर श्री. संजय घाडी, सभागृह नेते श्री. गणेश खणकर, शिक्षण समिती अध्यक्ष श्रीमती राजेश्री शिरवडकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री. किर्तीवर्धन किरीतकुडवे, कला अकादमीचे प्राचार्य श्री. दिनकर पवार व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
यंदा एकूण पाच गटांमध्ये ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेअंतर्गत इयत्ता पहिली व दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच्या गट क्रमांक १ करिता ३ विषय होते. यामध्ये ‘माझा चांदोमामा’, ‘माझी मनीमाऊ’, ‘मी माझ्या घरात’; इयत्ता तिसरी व चौथीतील विद्यार्थ्यांसाठीच्या गट क्रमांक २ करिता ‘मी झाडावर चढतो’, ‘मी फुलांच्या बागेत’, ‘मी आईसोबत लाडू बनवितो’; इयत्ता पाचवी व सहावीतील विद्यार्थ्यांच्या गट क्रमांक ३ करिता ‘आम्ही जंगलात फिरतो’, ‘आम्ही परग्रहावर’, ‘आम्ही शिवरायांचे मावळे’, असे विषय होते. तर इयत्ता सातवी व आठवीतील विद्यार्थ्यांसाठीच्या गट क्रमांक ४ करिता ‘आम्ही नदीच्या पाण्यात पोहतो’, ‘आमची वेषभूषा स्पर्धा’, ‘माझा आवडता मैदानी खेळ’, आणि इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या गट क्रमांक ५ करिता ‘पर्यावरण संवर्धन’, ‘माझी प्रगतिशील सुंदर मुंबई’, ‘गड संवर्धन’, असे विषय होते.
या स्पर्धेतील विद्यार्थ्यांच्या चित्रकृतींचे प्राथमिक, द्वितीय आणि नंतर अंतिम परीक्षण करुन विजेत्यांची यादी निश्चित करण्यात आली. अंतिम फेरीचे परीक्षक म्हणून सर. ज. जी. कला महाविद्यालयाचे माजी विभाग प्रमुख श्री. अनिल नाईक, सुप्रसिद्ध ऍनिमेशन फिल्म डिझायनर श्री. धीमंत व्यास, नेहरू सेंटर आर्ट गॅलरीचे संचालक श्री. संतोष पेडणेकर यांनी कामकाज पाहिले. स्पर्धेच्या निकालाचे परीक्षकांनी बंद करून दिलेले पाकीट आजच्या पत्रकार परिषदेत महापौर श्रीमती रितू तावडे यांच्या हस्ते उघडण्यात आले.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant