ठाणे जिल्ह्यातील पहिले तारांगण शहापूर येथे
ठाणे जिल्ह्यातील पहिले तारांगण शहापूर येथे
ठाणे - ठाणे जिल्ह्यात शहापूर येथे एक तारांगण ( Planetarium ) आणि चार अत्याधुनिक, मोठ्या दुर्बीणी असलेली वेधशाळा (Astronomical Observatory) बांधली आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन रविवार दि. ५ एप्रिल रोजी सायं.५ वाजता खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण आणि आमदार दौलत दरोडा यांच्याहस्ते होणार आहे.
निलेश ठाकूर आणि त्यांचे बंधू गिरीश ठाकूर यांना खगोलशास्त्राची आवड आहे. जनमानसात खगोलविज्ञानाची रूची निर्माण व्हावी यासाठी त्यांनी ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे साडेतीन एकर जागा घेऊन तेथे हा सॅपो प्रकल्प उभारला आहे. ठाणे जिल्ह्यातील हे पहिलेच तारांगण असून सोबत अत्याधुनिक मोठ्या चार दुर्बीणी असलेली वेधशाळाही त्यामध्ये आहे.
खगोलप्रेमींसाठी शहापूर येथील साकडभाव येथे पोकलेवाडी नजिक जुनोनी -कोथरा रोडवर हा सॅपो प्रकल्प उभारण्यात आला आहे. 7506266266 किंवा 7506322322 या दूरध्वनीवर ठाकूर बंधूंशी संपर्क साधून, नावे नोंदवूनच खगोलविज्ञान प्रेमींनी
या सॅपो प्रकल्पास भेट देता येणार आहे. या अत्याधुनिक तारांगणामध्ये ५६ सीटस् असून तेथे अर्धा ते एक तासांचा, मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत खगोलशास्त्रीय माहितीचा शो दाखविण्याची सोय आहे.
वेधशाळेत चार मोठ्या दुर्बीणी काॅन्क्रीट पीलर्सवर बसविण्यात आल्या असून आकाशनिरिक्षण करताना एक बटन दाबून स्वयंचलित छप्पर मागे नेण्याची सोय करण्यात आली आहे. १६,१४,१० आणि ६ इंच व्यास असलेल्या आरशाच्या दुर्बिणीतून आकाशातील वेगवेगळ्या गोष्टी निरिक्षण करण्याची सोय आहे. सोलर
फिल्टर लावलेल्या एका दुर्बिणीतून दिवसा सारडा, सौरज्वाला निरीक्षण करता येतात. दोन दुर्बिणी संगणकाला जोडलेल्या असून त्यातून दिसणाऱ्या गोष्टींचे छायाचित्रणही करता येते. तसेच प्रोजेक्टरच्या सहाय्याने पडद्यावर ती गोष्ट दाखविण्याची सोयही तेथे उपलब्ध करून देण्यात आली आहे.
दुर्बिणीतून गुरू ग्रहाचे चंद्र, गुरू ग्रहावरील पट्टा, डाग स्पष्टपणे दिसतो. शनी ग्रहाची वलये, देवयांनी दीर्घिका सुंदर दर्शन देतात. रात्रभर आकाश निरीक्षण करता येते. रात्री झोपण्यासाठी स्वतंत्र खोल्याही बांधण्यात आल्या आहेत. ग्रुपची डाॅरमेटरी आहेत. या सॅपो प्रकल्पात प्रदर्शन हाॅल आणि सेल्फ पाॅइंटस् देखील आहेत. आकाश दर्शन घडविण्यासाठी स्वयंसेवकही आहेत. तसेच खाद्यपदार्थ, भोजन यासाठी कॅन्टीनही आहे. ठाणे जिल्ह्यातील ठाकूर बंधूनी उभारलेले हे पहिले तारांगण आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant