अजब – जुहू चौपाटीवर समस्या ऐकण्यासाठी २५० रुपये, सोबत रडण्यासाठी हजार रुपयांत सुविधा
अजब – जुहू चौपाटीवर समस्या ऐकण्यासाठी २५० रुपये, सोबत रडण्यासाठी हजार रुपयांत सुविधा
मुंबई- वेगवान जीवनशैली आणि कामाच्या ताणामुळे आजकाल अनेकांमध्ये नैराश्याचे प्रमाण वाढले आहे. मनमोकळ्या संवादाचा अभाव, कुटुंबापासून कामानिमित्ताने दूर राहणे अशा विविध कारणांमुळे लोकांमध्ये एकटेपणाचे प्रमाण वाढत आहे. या समस्येवर मुंबईतील जुहू चौपाटीवर एका पठ्ठ्याने चक्क लोकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी आणि त्यांच्या दु:खात सहभागी होण्यासाठी सशुल्क सुविधा सुरू केली आहे.
मुंबईतील जुहू चौपाटीवरील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक व्यक्ती लोकांच्या समस्या ऐकण्यासाठी पैसे घेत असल्याचे दिसत आहे. साध्या फलकासह बसलेला हा व्यक्ती येणाऱ्या-जाणाऱ्यांना आपली समस्या सांगण्यासाठी आमंत्रित करताना दिसतो. साध्या संवादाला त्याने एका वेगळ्या सार्वजनिक सेवेसारखे रूप दिले आहे.
व्हिडिओमध्ये ही व्यक्ती आपले दर अगदी स्पष्टपणे सांगताना दिसते. छोट्या समस्यांसाठी तो २५० रुपये, मोठ्या चिंतांसाठी ५०० रुपये आणि सोबत बसून रडायचे असल्यास १,००० रुपये घेतो, असे तो सांगतो. त्याच्या म्हणण्यानुसार, अनेक लोक प्रत्यक्ष त्याच्याकडे येतात. तो त्यांच्याशी संवाद साधतो, त्यांचे विचार मोकळे होण्यास मदत करतो आणि मन हलके करण्याचा प्रयत्न करतो.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर