अतिरिक्त शुल्क न मोजताही मिळेल विमानात आवडीची सीट
अतिरिक्त शुल्क न मोजताही मिळेल विमानात आवडीची सीट
नवी दिल्ली- नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या नवीन नियमानुसार, प्रवाशांना पसंतीची जागा मिळवण्यासाठी आता विमान कंपनीला अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही. सध्या कंपन्या अतिरिक्त महसूल मिळवण्यासाठी पसंती शुल्क आकारतात. त्यामुळे हवाई प्रवास अधिक महाग झाला होता. हे लक्षात घेऊन DGCA ने विमान कंपन्यांना किमान ६०% जागांवरील असे शुल्क माफ करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे आता प्रवाशांना पसंतीनुसार जागा निवडण्यासाठी अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार नाही.
एअरलाइन्सना किमान ६०% जागा अतिरिक्त शुल्काशिवाय असल्याची खात्री करणे आवश्यक असेल. एकाच पीएनआरवर तिकीट बुक करणाऱ्या कुटुंबांना किंवा गटांना आता वेगवेगळ्या जागांवर बसवले जाणार नाही. एअरलाइन्सना प्रवाशांना लागून किंवा शेजारी-शेजारी जागा देणे बंधनकारक असेल, ज्यामुळे प्रवास अधिक सोईस्कर होईल.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर