विक्रोळी येथील विकास मराठी शाळेचा कृतीयुक्त शिक्षणाचा प्रयोग सहप्रवास २०२६ जल्लोषात
विक्रोळी येथील विकास मराठी शाळेचा कृतीयुक्त शिक्षणाचा प्रयोग सहप्रवास २०२६ जल्लोषात
मुंबई - विद्या विकास एज्युकेशन सोसायटी संचालित विकास हायस्कूल मराठी शिशु विभाग, मराठी प्राथमिक व माध्यमिक विभाग (सेमी-इंग्रजी माध्यम) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सहप्रवास २०२६’ या मराठी भाषा व माध्यमाच्या संवर्धनासाठी आयोजित कार्यक्रमाचे सादरीकरण विक्रोळी येथील शालेय सभागृहात शेकडो पालकांसमोर नुकतेच करण्यात आले.
विद्यार्थी, पालक व शिक्षक यांचा स्नेहमेळावा, सहप्रवास असणाऱ्या या कार्यक्रमात संस्थेच्या विश्वस्त श्रीम.माधवी नांदोसकर यांच्या हस्ते शाळेसाठी १ स्मार्ट बोर्ड व लोकसहभागातून विद्यार्थ्यांसाठी ४० बेंच मिळाले त्यांचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमात विद्यार्थी व पालक यांच्या संयुक्त विद्यमाने “माझी मराठी शाळा” या शीर्षकांतर्गत विविध शैक्षणिक कार्यक्रम सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला पालकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.सदर कार्यक्रम मराठी शाळेची महती सांगणारा, पालक-विद्यार्थी-शिक्षक यांच्यातील स्नेहबंध अधिक दृढ करणारा त्यांना प्रेरणा देणारा ठरला. जुन्या आठवणींना उजाळा देणारा हा स्नेहमेळावा व सहप्रवास सर्वांच्या मनात स्मरणीय ठरला. त्याचप्रमाणे जवळजवळ ३० ते ३५ माजी विद्यार्थी, २५० पालक, विद्यार्थी सर्व विभागातील मुख्याध्यापक,शिक्षकवृंद सर्व पालक प्रतिनिधी, शालेय व्यवस्थापन सदस्य उपस्थित होते.
विद्या विकास संस्थेचे आदर्श शिक्षक म्हणून राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त संस्थापक गुरूवर्य स्व. प. म. राऊत व माजी सीईओ स्व. सौ. विद्या प. राऊत यांच्या प्रेरणेतून शाळा गुणवत्तापूर्ण प्रयोगशील शिक्षणासाठी आजही कार्यरत आहेत. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानातर्गत विद्या विकास प्राथमिक शाळा वांगणी, विकास हायस्कूल माध्यमिक व विकास हायस्कूल इंग्रजी प्राथमिक विभागाला विभागनिहाय प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे.
विकास हायस्कूल मराठी व इंग्रजी प्राथमिक विभाग शाळांना SQAAF अंतर्गत A+ श्रेणी व स्वच्छ हरित विद्यालय मूल्यांकनात ५ स्टार रेटिंग मिळाले आहे . नवीन शैक्षणिक धोरणानुसार सर्व शिक्षक तंत्रस्नेही होऊन अध्ययन अध्यापन प्रक्रियेमध्ये शिक्षक त्याचा वापर करत आहेत शाळा आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे प्रेरणादायी केंद्र ठरत आहे. शिक्षण, संगीत, क्रीडा, नृत्य, योग, संरक्षणासाठी कराटे, इंग्रजी भाषा संभाषण वर्ग, पोषण आहार, संगणक, AI रोबॉटिक्स व इनोवेशन लैब या सुविधा व सेमि इंग्रजी असलेल्या या मराठी शाळा उपनगरातील विद्यार्थीप्रिय शाळा ठरल्या आहेत.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Mukesh S. Dhawade