दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार
दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार
हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावर अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार झाला आहे. शनिवारी मध्यरात्री रोहितच्या जुहू येथील बिल्डिंगवर हा गोळीबार करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच जुहू पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. या घटनेची गंभीर दखल घेत मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला आहे.गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. हा एफआयआर अज्ञात व्यक्तींविरोधात BNS आणि आर्म्स अॅक्टच्या संबंधित कलमांखाली नोंदवण्यात आलाय. आरोपींचा शोध घेण्यासाठी क्राइम ब्रांचकडून 12 विशेष पथकं तयार करण्यात आली असून, त्यांच्या अटकेसाठी तपास अधिक वेगाने सुरू आहे. रोहित शेट्टी हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक असून ‘गोलमाल’, ‘सिंघम’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांसाठी तो ओळखला जातो.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 19 MAR TO...
- 19 March, 2026
ADHARSH SWARAJ 12 MAR TO...
- 12 March, 2026
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant