गिरगावातील शोभा यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद
गिरगावातील शोभा यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई - स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान आयोजित गिरगावातील हिंदू नववर्ष स्वागत यात्रेला यंदा लाखोंची गर्दी जमली होती . गिरगावातल्या श्री फडके गणपती मंदिरापासून ते पिकेट रोड मारुती मंदिरापर्यंत जाणारा जगन्नाथ शंकर शेठ मार्गावर शोभायात्रा पाहायला आलेल्या लोकांची तुडुंब गर्दी जमली होती.प्रथम वंदे मातरम गीत सादर करत शोभा यात्रेला सुरुवात करण्यात आली होती.
वंदे मातरम गीताला दीडशे वर्ष पूर्ण झाल्या निमित्त यावर्षी शोभा यात्रेची संकल्पना वंद्य वंदे मातरम गीतावर वर आधारित होती. हिरवगार कार्पट पांगरलेला आणि त्यावर भारत माता विराजमान असलेला देखावा सर्वांचे लक्ष वेधत होता.जे जे स्कूल ऑफ आर्ट मधून पदवी मिळवणाऱ्या मूर्तिकार गितेश पवार आणि गौरव पवार यांनी क्रांतीसुर्य विनायक दामोदर सावरकर यांची २० फूट उंच प्रतिमा मेहनतीने साकारली होती.
शोभायात्री दरम्यान सावरकर भगतसिंग यासारख्या स्वातंत्र्यवीर आणि पौराणिक कथांवर आधारित सुंदर सुंदर चित्ररथ देखावे साकारण्यात आले होते. मल्लखांब , मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके मुलाना कडेवर घेऊन लोक आवर्जून पाहत होती. तात्या विंचूची वेशभूषा परिधान करून तसेच अनेक पारंपरिक वेशभूषा परिधान करून झालेल्या महिलांसोबत लोक एकसारखे सेल्फी काढत होती.
शिवसेना, काँग्रेस ,मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांतर्फे दूरवरून शोभा यात्रेसाठी आलेल्या नागरिकांकरता लिंबू सरबत ,कोकम सरबत, पिण्याच्या पाण्याची मोफत सोय करण्यात आली होती. घरांच्या महागड्या किमतीमुळे स्थलांतर झालेली मुळ गिरगावकर मंडळी गुढीपाडव्याच्या शोभायत्रेत सहभागी होण्यासाठी आपल्या पारंपरिक वेश परिधान करून नटून-थटून आवर्जून सामील झाली होती. या शोभे यात्रेमध्ये बच्चे कंपनीने देखील मोठ्या प्रमाणे सहभाग घेतला होता.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant