डॉ. शांताराम नाईक यांचे आकस्मिक निधन
मुबई (गुरुदत्त वाकदेकर) : बृहन्मुंबई महानगरपालिकेचे संयुक्त कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. शांताराम बाबुराव नाईक (निवृत्त) यांचे आज दिनांक १९ ऑगस्ट २०२२ रोजी कांदिवली येथील राहत्या घरी ह्रदय विकाराच्या तिव्र धक्क्याने निधन झाले.
८ नोव्हेंबर १९५९ रोजी जन्मलेल्या डॉ. शांताराम नाईक यांचे अभ्युदय नगर येथील शिवाजी विद्यालयात शालेय शिक्षण झाले होते. तर एल्फिन्स्टन महाविद्यलयात त्यांनी बारावी पर्यंतचे शिक्षण घेतले होते. किंग एडवर्ड मेमोरिअल हॉस्पिटल (के. ई. एम.) आणि शेठ गोरधनदास सुंदरदास मेडिकल कॉलेज येथून त्यांनी एम. बी. बी. एस. पर्यंत वैद्यकीय शिक्षण घेतले. पुढे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य खात्यात रूजू झाले.
त्यांच्यात कमालीचा साधेपणा होता. अतिशय शांत, संयमी तसेच इतरांच्या समस्येत सल्ला देऊन त्यांना सुयोग्य मार्ग दाखवणारे डॉ. शांताराम नाईक यांच्या आकस्मिक निधनामुळे समस्त कुटुंब, सहकारी अधिकारी व कर्मचारी वर्ग, मित्रपरिवार दुःखात बुडाले आहेत.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
गुरुदत्त वाकदेकर