Breaking News
देशामधील समस्त उद्योजकांचे श्रद्धास्थान असणारे पद्मविभूषण नामवंत उद्योजक मा. श्री रतनजी टाटा यांचा आज ८० वा वाढदिवस, अनेक स्तरावर आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करणारे उद्योजक रतन जी टाटा हे नेहमीच प्रत्येक भारतीयांसाठी एक खूप चांगले उदाहरण म्हणून समोर आले आहेत. फक्त उद्योग क्षेत्रामध्येच नाही तर इतर अनेक क्षेत्रामध्ये आपल्या नावाची मोहर लावणारे रतन टाटा स्वतःचा विचार करण्याआधी भारत देशाचा विचार करतात, आणि म्हणूनच कि काय भारत देशाचा मानबिंदू म्हणून सुद्धा रतन जी टाटा यांची ओळख बनली आहे.
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त चला जाणून घेऊया त्यांचे काही खास विचार आणि त्यांच्या बद्दलच्या काही खास गोष्टी
१ - टाटा ग्रुपने १०० पेक्षा अधिक क्षेत्रामध्ये आपली कामगिरी बजावली आहे, ज्यामध्ये सुई पासून विमानापर्यंत सगळ्याच क्षेत्राचा समावेश आहे.
२ - रतन जी टाटा यांना २००२ मध्ये पद्मभूषण तर २००८ मध्ये पद्मविभूषण या मानांकित पदव्यांनी त्यांचा गौरव करण्यात आला.
३ - मुंबईमध्ये ताज हॉटेलवर दहशतवादी हल्ला झाल्यांनतर, तेथे जखमी झालेल्या माणसांवर टाटा ग्रुपने उपचार केले शिवाय काही दिवसांसाठी हॉटेल बंद ठेवले असता, हॉटेलमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांचे पगार हे सुरूच ठेवण्यात आले होते.
४ - रतन टाटा यांनी टाटा स्टील मध्ये एक कर्मचारी म्हणून करियरची सुरवात केली होती, आणि त्यानंतर स्वतःच्या मेहनतीवर आणि जिद्दीवर टाटा समूहाचे सर्वेसर्वा बनून आज देखत आपल्या नावाचा डंका संपूर्ण जगामध्ये वाजवत आहेत.
५ - कोरोना महामारीच्या काळामध्ये, जिथे ऑक्सिजन पुरवठा कमी होत गेला त्यावेळी टाटा समूहाने पुढाकार घेत, ऑक्सिजन निर्मिती मध्ये आपले पाऊल टाकत संपूर्ण देशासाठी मोफत ऑक्सिजन पुरवठा केला.
६ - रतन टाटा यांनीच एयर इंडिया सारख्या मोठ्या आणि नामांकित एअरलाईन्स कंपनीला हात देत, टाटा समूहामध्ये विलीगीकरण करत पुन्हा नव्याने उभे केले.
अशाच पद्धतीचे अनेक कामे रतन जी टाटा यांनी आपल्या देशाच्या हितासाठी केली आहेत. आणि हि आम्हाला खरंच अभिमान आहे, असे उत्तम व्यक्तिमत्व आम्हला लाभले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant