NEET सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडीलांनी घेतला मुलीचा जीव मध्यमवर्गीयांना कर सवलत आणि कर रचनेतही सुधारणा वित्तमंत्री निर्मला सीतारामन सादर केला नऊ सूत्री अर्थसंकल्प RTE प्रवेशाबद्दल राज्य सरकारने काढलेला अध्यादेश अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा निर्णय मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड; जगभरात बँका, विमानतळांचं काम खोळंबलं! राज्यात १००० महाविद्यालयात कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार वृद्धांसाठी मोफत तीर्थदर्शन योजनेची घोषणा कोकण रेल्वेची वाहतूक अखेर सुरू विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने बाजी मारली, सर्व 9 पैकी 9 उमेदवार विजयी केंद्र सरकार या दिवशी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’ आज मतदान : विधानपरिषद निवडणूक : कोणाचा होणार पराभव? महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प विधानपरिषद निवडणुकीत चुरस , अकरा जागांसाठी बारा उमेदवार…. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात महत्वाचे बदल ‘गट क’ च्या रिक्त पदांची भरती MPSC तर्फे करणार शिवसेना ठाकरे गटाचा मुंबई पदवीधरचा बालेकिल्ला कायम देशात आजपासून लागू होणार नवे फौजदारी कायदे टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप टीम इंडियाच्या नावावर Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यात मुख्यमंत्री लाडकी योजना लागू करण्यासंदर्भात घोषणा ब्रेकींग: रशियाकडून युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा, जगभरात चिंता!

1 मे महाराष्ट्र दिन म्हणून का साजरा होतो?

1 मे महाराष्ट्र दिन  म्हणून का साजरा होतो?  

मुंबई : 15 ऑगस्ट 1947 ला देशाला स्वातंत्र्य मिळाले. मात्र, महाराष्ट्र (श्aप्arasप्tra) स्वतंत्र नव्हता! भारत स्वतंत्र झाला तेव्हा देशाचा नकाशा पूर्णपणे वेगळा होता. पुढे हळूहळू देशातील राज्य भाषा आणि प्रदेशाच्या आधारावर वेगळी झाली. त्यानुसार 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्यातची निर्मिती झाली. त्यामुळे हा दिवस महाराष्ट्र दिन  म्हणून साजरा केला जातो. हा दिवस मराठी माणसाचा आणि तो मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या 106 हुतात्म्यांचं स्मरण या दिवशी केलं जातं. 1 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामदार दिनहणूनही ओळखला जातो.  
महाराष्ट्राची निर्मिती कशी झाली? - देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक प्रांतीय राज्य मुंबई प्रांतात विलीन करण्यात आली. त्यावेळी मुंबई प्रांतात गुजराती आणि मराठी भाषा बोलणारे लोक राहत होते. त्याचवेळी भाषावार प्रांत रचनेची मागणी जोर धरु लागली. गुजराती भाषिकांनी स्वत:चं वेगळं राज्य हवं होतं. त्याचवेळी मराठी भाषिक नागरिकही स्वतंत्र राज्याची मागणी करत होते. या मागणीसाठी अनेक आंदोलनं झाली. या आंदोलनाचा परिणाम म्हणून 1960 मध्ये मुंबई पुनर्रचना कायद्याअंतर्गत महाराष्ट्र आणि गुजरात अशा दोन राज्यांची निर्मिती करण्यात आली.  
106 आंदोलक हुतात्मे झाले  - 21 नोव्हेंबर 1956 रोजी फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते. कारण राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले होते, त्यामुळे मराठी माणसे चिडली होती. सर्वत्र छोट्यामोठ्या सभांमधून या निर्णयाचा निषेध होत होता. या संगठनामुळे कामगारांचा एक विशाल मोर्चा सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटनासमोरील चौकात येण्याचे नियोजन झाले.  
त्यानंतर प्रचंड जनसमुदाय एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून आणि दुस्रया बाजूने बोरीबंदरकडून गगनभेदी घोषणा देत, फ्लोरा फाउंटनकडे जमला. मोर्चा पोलिसांची ताकद वापरून उधळून लावण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला. मात्र अढळ सत्याग्रहींमुळे पोलिसांचे सर्व प्रयत्न अयशस्वी झाले आणि पोलिसांना गोळीबाराचा आदेश मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याद्वारे देण्यात आला. गोळीबार झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात 106 आंदोलक हुतात्मे झाले.  
या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे आणि मराठी माणसाच्या आंदोलनामुळे अखेर सरकारने नमते घेऊन 1 मे, 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली. त्यानंतर 1965 मध्ये त्या जागी हुतात्मा स्मारकाची उभारणी करण्यात आली.  

रिपोर्टर

संबंधित पोस्ट