लालबागचा राजा मंडळाचा आधुनिक उपक्रम : ‘AI डिजिटल लायब्ररी’चे उद्घाटन सोहळा २४ फेब्रुवारी रोजी
लालबागचा राजा मंडळाचा आधुनिक उपक्रम : ‘AI डिजिटल लायब्ररी’चे उद्घाटन सोहळा २४ फेब्रुवारी रोजी
मुंबई : लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या देशातील अग्रगण्य व प्रतिष्ठित गणेशोत्सव मंडळाच्या वतीने समाजोपयोगी आणि आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडणारा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. ‘लालबागचा राजा AI अंकिय ग्रंथालय’ (Lalbaugcha Raja AI Digital Library) या अभिनव डिजिटल ग्रंथालयाच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन मंगळवार, दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ७.०० वाजता लालबाग येथे करण्यात आले आहे.
या सोहळ्याचे उद्घाटन प्रसिद्ध संगणक तज्ज्ञ व लेखक डॉ. अच्युत गोडबोले यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून खासदार अरविंद सावंत, आमदार अजय चौधरी, नगरसेविका भारती पेठेणकर तसेच नगरसेवक किरण तावडे उपस्थित राहणार आहेत.
हे डिजिटल ग्रंथालय सर्वांसाठी विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार असून विद्यार्थ्यांना, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या युवकांना तसेच सर्वसामान्य नागरिकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ज्ञानसंपदा सहज उपलब्ध करून देण्याचा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित या ग्रंथालयामुळे वाचन संस्कृतीला चालना मिळणार असून डिजिटल युगात ज्ञानाचे नवीन दालन सर्वांसाठी खुले होणार आहे.
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे केवळ धार्मिक उत्सवापुरते मर्यादित न राहता सामाजिक, शैक्षणिक व जनकल्याणकारी उपक्रमांसाठी नेहमीच अग्रस्थानी राहिले आहे. रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी, शैक्षणिक मदत, आपत्तीग्रस्तांना सहकार्य आणि विविध सामाजिक प्रकल्पांद्वारे मंडळाने समाजात आदर्श निर्माण केला आहे. आता AI डिजिटल ग्रंथालयाच्या माध्यमातून मंडळाने ज्ञानदानाचा एक महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला असून यामुळे समाजातील सर्व स्तरातील नागरिकांना मोठा लाभ होणार आहे.
मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे, मानद सचिव सुधीर साळवी आणि खजिनदार मंगेश दळवी यांनी सर्व नागरिकांना या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. हा उपक्रम लालबाग परिसरासह संपूर्ण मुंबईसाठी अभिमानाची बाब ठरत असून सामाजिक व शैक्षणिक प्रगतीसाठी एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant