रेखाताई हिरेमठ यांचा सिंधुताई सपकाळ समाजभूषण पुरस्काराने गौरव
रेखाताई हिरेमठ यांचा सिंधुताई सपकाळ समाजभूषण पुरस्काराने गौरव
मुंबई - इमेज इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स अंतर्गत प्रदान करण्यात येणारा ‘सिंधुताई सपकाळ समाजभूषण पुरस्कार-२०२६’ हा मानाचा पुरस्कार कर्जत तालुक्यातील शेलू गावातील सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती रेखा बसवेश्वर हिरेमठ यांना प्रदान करण्यात आला.
सिंधुताई सपकाळ उर्फ ‘माई’ यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून गेली तब्बल २५ वर्षे समाजसेवेचे व्रत जपणाऱ्या रेखाताईंना हा पुरस्कार प्रसिद्ध अभिनेते दिपक जोशी यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
समाजासाठी असलेली आपुलकी, जिव्हाळा व माणुसकी ही मूल्ये केंद्रस्थानी ठेवून त्यांनी सामाजिक कार्यातून व्यापक जनसंपर्क निर्माण केला. महिलांना सक्षम व स्वावलंबी करण्यासाठी केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न, विविध शासकीय योजनांचा लाभ महिलांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य, तसेच अनेकांच्या सुख-दुःखात सहभागी होऊन त्यांच्या जीवनात आशेचे व आनंदाचे क्षण निर्माण करण्याचे त्यांचे कार्य अत्यंत प्रेरणादायी व कौतुकास्पद आहे.
संबंधित पोस्ट
विशेष:
ई पेपर
ADHARSH SWARAJ 5 FEB TO...
- 05 February, 2026
ADHARSH SWARAJ 29 JAN TO...
- 29 January, 2026
ADHARSH SWARAJ 15 JAN TO...
- 15 January, 2026
ADHARSH SWARAJ 8 JAN TO...
- 14 January, 2026
25 DEC TO 31 DEC 2025...
- 31 December, 2025
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Adarsh Swarajya News
Karishma Sawant